*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी प्रशाला मधील शिक्षक तसेच शिक्षक सेना सोलापूर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब दादासाहेब भिसे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे
कोर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल चे इंग्रजी विषयाचे शिक्षक आबासाहेब मारुती कारंडे यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून १३ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनाही हा पुरस्कार कुर्डूवाडी येथे प्रदान करण्यात येणार आहे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
सदरचा पुरस्कार पंढरपूर येथील प्राध्यापक बी पी रोंगे यांच्या सवेरी इन्स्टिट्यूट पंढरपूर यांच्याकडून जाहीर झाला आहे येत्या 13 सप्टेंबर 2026 रविवारी दुपारी दीड वाजता तुळजाई लॉन्स बार्शी नाका, करमाळा रोड, कुर्डूवाडी या ठिकाणी पुरस्कार वितरित करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर बी. पी. रोंगे यांनी एका जाहीर प्रसिद्धी द्वारे माहिती दिली आहे
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता कोर्टी येथील पत्रकार शिक्षक बाळासाहेब भिसे यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दल त्यांचे शिक्षक वर्गातून विशेष अभिनंदन होत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा