Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मनसेचा मोठा निर्णय: महावितरणकडून शेतातील डीपी, पोल आणि वीजवाहिन्यांची भरपाई मिळवण्यासाठी मोफत अर्ज नमुना व मार्गदर्शन :- संजय (बापु) घोलप

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


महावितरणने (MSEDCL) शेतकऱ्यांच्या खाजगी शेतजमिनीमध्ये डीपी (ट्रान्सफॉर्मर), विजेचे खांब (पोल), सब-स्टेशन उभारले असल्यास अथवा उच्च दाबाची वाहिनी (High Voltage Line) टाकली असल्यास, जमिनीच्या वापरापोटी तसेच पिकांच्या व जमिनीच्या कायमस्वरूपी नुकसानीपोटी 'राइट ऑफ वे' (Right of Way - RoW) कायद्यांतर्गत नुकसानभरपाई आणि योग्य मोबदला मागण्याचा कायदेशीर अधिकार शेतकऱ्यांना आहे.

या कायद्याची योग्य माहिती न मिळाल्याने आजवर अनेक शेतकरी आपल्या हक्काच्या भरपाईपासून वंचित राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुक्याच्या विधी व न्याय कक्षाच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मनसे करमाळा तालुकाध्यक्ष मा. संजय (बापू) घोलप यांनी दिली आहे.

महावितरणकडे कसा करावा अर्ज?

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागलेले पोल, डीपी, सब-स्टेशन किंवा गेलेल्या वीजवाहिन्यांमुळे झालेल्या नुकसानीचा भाडेमोबदला व भरपाई मागण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे (Executive Engineer) रीतसर अर्ज सादर करणे आवश्यक असते.

मनसेतर्फे मोफत अर्ज व कायदेशीर मदत उपलब्ध:

आपल्या शेतातील डीपी, पोल, सब-स्टेशन किंवा विजेच्या तारांमुळे होणाऱ्या नुकसानीचा मोबदला महावितरणकडून कसा मिळवायचा आणि त्यासाठीचा अधिकृत अर्जाचा नमुना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांच्याकडून शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जात आहे.

तसेच अर्ज भरण्यापासून ते महावितरण कार्यालयाकडे सादर करेपर्यंत सर्व आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन मनसे विधी व न्याय कक्षाकडून केले जाईल. विधीतज्ञ अॅड मनोजकुमार कांबळे मो.8975304096 ,अॅड निखिल मांगले मो.7719016049 ,अॅड अर्पणा पदमाळे मो.9421023276 

शेतकऱ्यांनी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा हे मनसे विधी व न्याय कक्षाकडून आपल्याला मोफत मार्गदर्शन करतील व अर्ज नमुना देतील 

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून महावितरणच्या वाहिन्या गेल्या आहेत किंवा खांब/डीपी बसवले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या भरपाईसाठी मनसे करमाळा तालुका व शहर पदाधिकारी किंवा तालुकाध्यक्ष मा. संजय (बापू) घोलप यांच्याशी संपर्क साधावा, मो.9011148077 असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा