Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

*राजकारणाच्या पलीकडे जाऊन आबांनी जपलेले माणुसकीचे नाते..…!*

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर अमेरिकेत यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते मायभूमीत परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी निमगाव येथे जाऊन बबनदादा शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

बोलण्यापेक्षा कृतीतून आपली माणुसकी दाखवण्याचा आबांचा स्वभाव सर्व परिचित आहे.

“राजकारण येते-जाते; मात्र माणुसकीचे नाते आणि ऋणानुबंध कायम जपले पाहिजेत,” ही भूमिका आमदार नारायण आबा पाटील आपल्या कृतीतून कायम दाखवून देत आले आहेत..

बबनदादा शिंदे यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या पुढील निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी नारायण आबा पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या भेटीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीच्या नातत्याने आदरणीय नारायण आबांनी बबनदादांची घेतलेली भेट खूप काही सांगून जाते.

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय नवले उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा