*अकलूज-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी-
*मो:-9730867448*
शेतकरी बांधवांना या द्वारे नम्र विनंती करण्यात येते की खत खरेदी आता अधिक सोपी झाली आहे व शेतकरी बांधवांना आता खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही !केंद्र शासनाने खत खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ पारदर्शक आणि जलद करण्यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल एफ एफ एस हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणले आहे या मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या गरजेनुसार घरबसल्या खताची बुकिंग करू शकतील आणि दुकानातून क्यूआर कोड व टोकन नंबर दाखवून खत मिळवू शकतील महाराष्ट्रात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे व तो आता रत्नागिरी जिल्ह्यातील राबविलाजात आहे . तदनंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या ॲपद्वारेच खताची विक्री होणार आहे .ॲप कसे वापरावे हे ॲप गूगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध असून स्मार्टफोन आणि आधार कार्ड वर लिंक असलेल्या मोबाईल नंबर टाकून हे आपण वापरू शकता .ॲपचा वापर करण्यासाठी ॲप उघडून राज्य निवड करा फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक टाकून लॉगिन ओटीपी सह करून घ्यावे . या प्रक्रियेद्वारे खत खरेदी साठी फार्मर आयडी महत्वाचा आहे . याशिवाय खरेदी करता येणार नाही . FFS ॲपचे फायदे -१-फार्मर आयडीवर नमूद केलेल्या पिकावर नुसार शेतकरी त्यांच्या गरजेनुसार घरबसल्या मोबाईल वरून खताचे बुकिंग करू शकणार आहेत २ -तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ पिकाचा प्रकार व माती पाणी परीक्षण या आधारे ॲप स्वतः खताची योग्य मात्रा सुचवते यामुळे खताच्या बचत होते . ३ - या ॲप या द्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या नजीकच्या मान्यताप्राप्त खत विक्रेत्याची निवड करून तिथे खतबुकिंग करू शकतात . ४ -नजीकच्या मान्यताप्राप्त खत विक्रेत्याकडे खताचे बुकिंग केल्यावर किंवा क्युआर कोड किंवा टोकन नंबर तयार होतो या नंबरच्या आधारे खत दुकानदाराला दाखवून खत मिळवता येते . ५ -खत खरेदीसाठी रांगेत उभा राहण्याची गरज भासणार नाही ६ -शेतकऱ्यांच्या हक्काच्या खताचा अकृर्षक वापर वर निर्बंध शेतकऱ्यांच्या हक्काचे खत आता फक्त शेतकऱ्यांनाच मिळणार हे या ॲपद्वारे खते खरेदी करण्याचे फायदे आहेत .जर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढलेला नसेल तर तुम्ही जमिनीचे मालक आहात की कुळ हे निवडून जमिनीचा तपशील उदाहरणार्थ सर्वे नंबर पीक क्षेत्र इत्यादी माहिती भरावयाची आहे परंतु भविष्यात फार्मर आयडी शिवाय कुठल्या प्रकारचे खत शेतकऱ्यांना उपलब्ध होणार नाही .खताचे जमिनीचे क्षेत्र व पिक आणि हंगाम नुसार बुकिंग केल्यानंतर किंवा आर कोड किंवा टोकन नंबर द्वारे खरेदी करावयाचे आहे त्यासाठी स्वतः जाणार असाल तर तर तसे निवडा किंवा दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्रतिनिधी पाठवणार असाल तर त्याचा आधार व मोबाईल नंबर नोंदवणे अनिवार्य आहे. . .
खतांचा संतुलित वापर खतांचा संतुलित वापर युरियाचा अतिवापर टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हक्काच्या युरियाचा गैर कृषी वापर टाळण्यासाठी प्रति शेतकरी प्रति हेकटरी प्रति हंगाम युरिया जास्तीत जास्त पाच गोण्या आणि डीएपी खताच्या जास्तीत जास्त चार गोण्या खरेदी करता येणार आहेत .या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणारा असून खत वाटपात अधिक पारदर्शकता येईल अधिक माहितीसाठी आणि ॲप वापरा संदर्भात मार्गदर्शनासाठी नजीकच्या परवानाधारक विक्रेत्याशी ,सहाय्यक कृषी अधिकारी , उप कृषि अधिकारी मंडल कृषी अधिकारी कृषी अधिकारी गुण नियंत्रण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा