*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9730867448*
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याकडे दोन लाख 75 हजार एकर शेत जमीन आहे .
ॲमेझॉन चे संस्थापक जे फ बेजोस यांच्याकडे चार लाख 62 हजार एकर जमीन आहे .
वॉलमार्टशी संबंधित स्टॅन
क्रॉन्के यांच्याकडे तब्बल 27 लाख एकर जमीन असून 2025 मध्ये त्यांनी न्यू मेक्सिको मध्ये तब्बल नऊ लाख 38 हजार एक जमीन खरेदी केले आहे जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा जमीन व्यवहार मानला जातो .
अमेरिकेत शेत जमिनीच्या किमतीत सुमारे 4.3% वाढ एक वर्षात झाले आहे छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या आव्हानं वाढत चालले आहेत हे जसं अमेरिकेत घडतं तसं भारतातही घडत आहे .
एखादा महामार्ग राजमार्ग सरकार दरबारी मार्गाची आखणी ठरू लागते त्यावेळी उद्योजक बिल्डर गर्भ श्रीमंत अशी एक साखळी व्यवस्थेमध्ये घुसून लहान शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करायचा शोधात असते .
या जमिनींना नंतर शासकीय नियमाप्रमाणे प्रचंड भाव मिळतो शासकीय दराप्रमाणे या जमिनी महामार्ग राजमार्गासाठी विकत घेतले जातात . मात्र छोटे शेतकरी हातबल असहाय्य अगदी ठरतात . त्यांनी त्या जमिनी अगोदरच विकलेले असतात . जगाच्या पाठीवर भांडवलदारांच राज्य आहे .
जगाच्या पाठीवर दोनच वर्ग आहे एक शोषक दुसरा शोषित . एकाकडे आहे रे आणि दुसऱ्याकडे नाही रे हा संघर्ष पूर्वी होता आज आहे आणि भविष्यातही राहणार .
देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी वीस हजार लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये काढून अण्णाभाऊ साठेंची एकच घोषणा होती ये हैबिर्ला! ये है टाटा!कुठे आहे माझ्या धनाचा वाटा?
व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी नवीन पिढीने कार्लमाकर्स .वाचला पाहिजे . फुले शाहू आंबेडकर चळवळ समजून घेतली पाहिजे .
अमेरिका हे विकसित राष्ट्र आहे भारत देश विकसनशील म्हणजे विकासाच्या दिशेने आता चालले आहे परंतु जात असताना हे गतिरोधक ही अडथळे समजून घेणे काळाची गरज आहे .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा