*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9730867448*
अकलूज येथील संकेतिका वाचनालय, दत्तनगर–राऊतनगर यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती व शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान व व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोशी सर होते व प्रमुख अतिथी विश्वनाथ आवड सर यांचे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले माणूस हा आजन्म विद्यार्थी असावा ज्यामुळे त्याला सदैव ज्ञानाचा झरा मिळत राहील. सध्या ज्ञानाचा विस्फोट होत असून आजच्या शिक्षकांपुढे आपला विद्यार्थी हा या चालत्या काळात सक्षम बनवणे हे एक मोठे आव्हान आहे असा विचार व्यक्त केला.
या कार्यक्रमात शिक्षक दिनाचे औचित्य साधून -संतोष कोल्हे, अशोक राजगुरू, विजय गायकवाड, शेरखान पठाण , इब्राहिम बागवान , प्रदीप राजगुरू, निसार पठाण , कैलास गायकवाड, प्रवीण गायकवाड ,मारुती जाधव, जगदीश जाधव , वीरेंद्र पत्की , रामभाऊ काटकर , सौ सुषमा यादव ,मारुती यादव, आदि शिक्षकांचा सन्मान संकेतिका वाचनालयाच्या वतीने करण्यात आला उपक्रमामुळे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे भाग्य तर लाभलेच मात्र त्या बरोबरच ज्ञान व विचारांची देवाणघेवाण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे आयोजन संकेतिका वाचनालय अध्यक्ष सचिव व संचालक मंडळ यांनी उत्तम प्रकारे केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांकेतिका वाचनालयाचे अध्यक्ष मारुती क्षीरसागर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक राजगुरू, निसार पठाण, जगदीश जाधव,प्रदीप राजगुरू, संतोष कोले यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती जाधव सर यांनी केले.
______________________________________________








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा