*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर जिल्ह्यासह करमाळा शहर व तालुक्यात सप्टेंबर उजाडला तरीही वरुण राजाने पाठ फिरवल्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे.बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली असून पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी पावसासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करत दुआ करण्यात आली. या अल्लाह बारिश बरसा दे अशा पद्धतीने परमेश्वराकडे दुवा करीत करमाळातील मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली
शहरातील करमाळा टेंभुर्णी महामार्गावरील असणाऱ्या ईदगाह मैदानावर रविवारी दुपारी २ वाजताच्या नमाजनंतर हाफिज मौलाना मरगबुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामूहिक प्रार्थना करण्यात आली.शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पाऊस पडावा,कुठेही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये,जनावरांना चारा-पाणी मिळावे, तलाव, विहिरी आणि धरणे भरून निघावीत आणि संपूर्ण सृष्टीवर अल्लाहची कृपा व्हावी यासाठी मनोभावे दुआ करण्यात आली.
यावेळी हात वर करून भरल्या डोळ्यांनी पावसाची याचना करण्यात आली.लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरंगले होते. या भावनिक प्रसंगामुळे ईदगाह मैदानावर हळवे वातावरण निर्माण झाले होते.याप्रसंगी शहरातील मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा