Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

धाराशिव जिल्हयातील विविध योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची थकीत देयके वितरण करण्यासाठी कृषी विभाग अंतर्गत रिक्त असलेली विविध पदे तात्काळ भरावीत मा.आमदार ज्ञानराज चौगुले यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी

 तुळजापूर प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो9730867448


धाराशिव जिल्हयातील विविध योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची थकीत देयके वितरण करण्यासाठी कृषी विभाग अंतर्गत रिक्त असलेली विविध पदे तात्काळ भरावीत अशी मागणी उमरगा लोहारा चे मा.आमदार ज्ञानराज चौगुले यांनी  राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे


याबाबत सविस्तर वृत्त असे कि मागील काही वर्षांत सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच फळबाग लागवाड, यांत्रिकीकरण अवजारे आदी योजनांसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची थकीत देयकांबाबत नुकतेच शासनाने निधी वितरण आदेश पारीत केलेला आहे. परंतु सध्या धाराशिव जिल्हयातील कृषी विभागाअंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, धाराशिव तसेच कृषी उपसंचालक, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, यांसह सर्वच ८ तालुक्यांतील तालुका कृषी अधिकारी ही पदे रिक्त आहेत. सध्या जिल्हयात दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच लाभार्थी शेतकऱ्यांची शासनाच्या योजना राबविण्यासाठी कर्ज काढुन कामे पुर्ण केलेली आहेत. त्यांचा निधी शासनस्तरावरून उपलब्ध होऊनही केवळ जिल्हयातील कृषी विभागाची पदे रिक्त असल्याने अद्याप शेतकऱ्यांना वितरीत होऊ शकलेला नाही.


तरी उपरोक्त सर्व बाबींचा विचार करून धाराशिव जिल्हयातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, ही विनंती. निवेदनाद्वारे केली आहे

आपला नम्र,

(ज्ञानराज धोंडीराम चौगुले.) मा. विधानसभा सदस्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा