*नळदुर्ग --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
नळदुर्ग :_ नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील सर्वात उंच असणाऱ्या उपली बुरुजावरून अंबुलगा ता. निलंगा येथील अश्विनी मनोहर पौळ या आपल्या तीन लहान मुलांसह खोल खाली उडी मारून आत्महत्या केल्या असुन. या दुर्दैवी घटनेमध्ये अश्विनी पौळ आणि तिचा साडेपाच वर्षाचा मुलगा अजिंक्य पौळ यांचा जागीच मृत्यु झाला तर अश्विनीच्या दोन जुळ्या मुली वीरा पौळ अडीच वर्षे आणि क्रांती पौळ अडीच वर्षे या गंभीर जखमी झाली होती अखेर तिचाही मृत्यू झाला असुन त्यांच्यावर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या या दोन्ही मुली मृत्युशी झुंज देत आहेत. हा नेमका प्रकार कशामुळे आणि का घडला याची पोलिस कसुन चौकशी करत आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अंबुलगा ता. निलंगा जि. लातुर येथील अश्विनी मनोहर पौळ वय 30 वर्षे या दि. 3 सप्टेंबर रोजी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात किल्ला पाहण्याच्या निमित्ताने आल्या होत्या. यावेळी अश्विनी आपली मुले अजिंक्य मनोहर पौळ वय साडेपाच वर्षे, वीरा मनोहर पौळ वय अडीच वर्षे आणि क्रांती मनोहर पौळ वय अडीच वर्षे यांच्यासह किल्ल्यातील सर्वात उंच असणाऱ्या उपली बुरुजावर गेले होते. यावेळी दुपारी 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास तब्बल 150 फुट उंच असणाऱ्या उपली बुरुजावरील एका छोट्या कमानीमधुन अश्विनीने आपल्या तीन मुलांसह 150 फुट खोल खाली उडी मारली यामध्ये अश्विनी पौळ आणि त्यांचा मुलगा अजिंक्य पौळ हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला तर अश्विनी यांच्या दोन जुळ्या मुली वीरा आणि क्रांती वय अडीच वर्षे या गंभीर जखमी झाली होती उपचारादरम्यान अखेर तिनेही शेवटी जगाचा निरोप घेतला. हा प्रकार नेमका कशामुळे आणि का घडला? याची चौकशी सध्या पोलिस करत आहेत. ही आत्महत्या आहे की आणखी याच्या मागे कोणते कारण आहे हे तपासले जात आहे.
अश्विनी मनोहर पौळ या मुंबई येथे MSF मध्ये नोकरीला होत्या तर त्यांचे पती मनोहर पौळ हे रीक्षाचालक असल्याचे समजते. अश्विनी पौळ यांचे माहेर व्हंताळ ता. उमरगा जि. धाराशिव हे आहे. अश्विनी पौळ यांनी चार ते पाच महिन्यापुर्वी पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून नोकरीची रीजाईन दिली होती. त्याचबरोबर मागील तीन महिन्यांपासुन अश्विनी आपल्या तीन मुलांसह माहेरीच राहत होती.अश्विनीचे वडील शिक्षक आहेत.अश्विनीने इतका टोकाचा निर्णय का घेतला?या घटनेमागे कौटुंबिक कारण आहे की आणखी कुठले कारण आहे हे समजु शकले नाही.
किल्ल्याचे इन्चार्ज नागनाथ गवळी यांनी या घटनेची माहिती देताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अख्तर सय्यद आणि नळदुर्ग बीट अंमलदार खलील शेख हे तात्काळ घटनास्थळी धावुन गेले.सुरुवातीला त्यांनी दोन जखमी मुलींना उपचारासाठी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी या दोन्ही मुलींना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अतिशय दुर्दैवी ही घटना घडली असुन या घटनेमुळे पुन्हा एकदा नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुर्वी किल्ला संगोपन योजनेअंतर्गत हा किल्ला युनिटी मल्टीकॉन्स कंपनीला देण्यात आला होता त्यावेळी कंपनीने किल्ल्यातील उपली बुरुजासह महत्वाच्या व धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले होते. मात्र आज या किल्ल्यात कुठलीच सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नाही.या घटने नळदुर्ग शहर व परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस ही आत्महत्या आहे की यामागे आणखी कुठले कारण आहे याचा शोध घेत आहेत. पोलिस तपासानंतरच या घटनेमागील खरे सत्य समोर येणार आहे. मयत अश्विनीच्या वडिलांनी मात्र नवरा व सासरच्या मंडळी करून होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केली चे सांगितले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा