Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२६

. रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने बिबवेवाडी येथे संपन्न "श्री उवसग्गहरं स्तोत्र " सामुदायिक जाप कार्यक्रमामध्ये हजारो श्रावकांचा उस्फुर्त सहभाग !

 *पुणे, डॉ. संदेश शहा*.

*टाईम्स 45 न्यूज मराठी* 

*रविवार दि. ७ सप्टेंबर २०२६*

*सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*


श्री रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता बिबवेवाडी जैन स्थानकाच्या प्रांगणामध्ये भव्यदिव्य सुशोभित मंडपात, साधुसंतांच्या सान्निध्यात महामंगलकारी " श्री उवसग्गहरं स्तोत्र " या जापचे हजारोंच्या संख्येने सामुदायिक पठण करण्यात आले. या स्तोत्रचे पठण मुंबई येथील तान्हारीरी या ग्रुपने संगीतमय सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  दिगंबर आचार्य पू. श्री. प्रणामसागरजी म. सा., वाणी के जादुगर पू. श्री. रमणिकमुनिजी म. सा., विरायतनच्या शिल्पकार आचार्य पू. श्री. चंदनाजी म. सा. यांच्या सुशिष्या पू. श्री, विभाजी म. सा. व पू. श्री. सुमित्राजी म. सा. तसेच महासाध्वी पू. श्री. सुयशाश्रीजी म. सा. आदी साधु-साध्वीगण यांच्या उपस्थितीत हा मंगलमय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जय जिनेंद्र चा जयघोष करण्यात आला. 


या कार्यक्रमाचे आयोजन श्री. रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल, उद्योजक पुनीतजी बालन परीवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ऑल इंडिया ॲंटी टेररिस्ट फ्रंट (AIATF) चे अध्यक्ष श्री. मनिंदरजीत सिंग बिट्टा, बिबवेवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलालजी ओस्तवाल, एज्युकेशन कॅम्प सोसायटीचे अध्यक्ष वालचंदजी संचेती, मिलिंदजी फडे, देवीदासजी भन्साळी, अचलजी जैन, नगरसेविका मनिषा चोरबेले, प्रवीणजी चोरबेले अशा अनेक विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक, व जैन -अजैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 यावेळी शोभाताई धारीवाल यांनी फाऊंडेशनच्या वतीने सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

यावेळी त्या म्हणाल्या, जैन धर्मांमध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून  सुरू आहे, धर्मात अनेक मंत्र सांगितले आहेत, त्यापैकी श्री उवसग्गहरं स्तोत्र हा मंत्र संकटावर मात करणारा असून याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे. श्रीमान रसिकलालजी धारीवाल साहेब कित्येक वेळा उपचारासाठी रुग्णालयात व्हेंटिलेटर वर असतांना या उवसग्गहरं स्तोत्र जापचे मी पठण करीत होते, या जापमुळे सकारात्मक उर्जा तयार होऊन त्यांचे प्राण वाचू शकले, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे, म्हणूनच मी रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने गेली दहा वर्षांपासून सातत्याने या मंगलमय स्तोत्र पठण सामुदायिक कार्यक्रमाचे  आयोजन करत असते. याचा दहा वर्षात अनेकांना सकारात्मक लाभ झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  शेवटी शोभाताई धारीवाल परीवाराच्या वतीने आयोजित गौतम प्रसादीचा लाभ हजारो श्रावक श्राविका यांनी घेतला. रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता बिबवेवाडी जैन स्थानकाच्या प्रांगणामध्ये भव्यदिव्य सुशोभित मंडपात, साधुसंतांच्या सान्निध्यात महामंगलकारी " श्री उवसग्गहरं स्तोत्र " या जापचे हजारोंच्या संख्येने सामुदायिक पठण करण्यात आले. या स्तोत्रचे पठण मुंबई येथील तान्हारीरी या ग्रुपने संगीतमय सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  दिगंबर आचार्य पू. श्री. प्रणामसागरजी म. सा., वाणी के जादुगर पू. श्री. रमणिकमुनिजी म. सा., विरायतनच्या शिल्पकार आचार्य पू. श्री. चंदनाजी म. सा. यांच्या सुशिष्या पू. श्री, विभाजी म. सा. व पू. श्री. सुमित्राजी म. सा. तसेच महासाध्वी पू. श्री. सुयशाश्रीजी म. सा. आदी साधु-साध्वीगण यांच्या उपस्थितीत हा मंगलमय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जय जिनेंद्र चा जयघोष करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल, उद्योजक पुनीतजी बालन परीवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ऑल इंडिया ॲंटी टेररिस्ट फ्रंट (AIATF) चे अध्यक्ष श्री. मनिंदरजीत सिंग बिट्टा, बिबवेवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलालजी ओस्तवाल, एज्युकेशन कॅम्प सोसायटीचे अध्यक्ष वालचंदजी संचेती, मिलिंदजी फडे, देवीदासजी भन्साळी, अचलजी जैन, नगरसेविका मनिषा चोरबेले, प्रवीणजी चोरबेले अशा अनेक विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक, व जैन -अजैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 यावेळी शोभाताई धारीवाल यांनी फाऊंडेशनच्या वतीने सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

यावेळी त्या म्हणाल्या, जैन धर्मांमध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून  सुरू आहे, धर्मात अनेक मंत्र सांगितले आहेत, त्यापैकी श्री उवसग्गहरं स्तोत्र हा मंत्र संकटावर मात करणारा असून याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे. श्रीमान रसिकलालजी धारीवाल साहेब कित्येक वेळा उपचारासाठी रुग्णालयात व्हेंटिलेटर वर असतांना या उवसग्गहरं स्तोत्र जापचे मी पठण करीत होते, या जापमुळे सकारात्मक उर्जा तयार होऊन त्यांचे प्राण वाचू शकले, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे, म्हणूनच मी रसिकलालजी एम. धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने गेली दहा वर्षांपासून सातत्याने या मंगलमय स्तोत्र पठण सामुदायिक कार्यक्रमाचे  आयोजन करत असते. याचा दहा वर्षात अनेकांना सकारात्मक लाभ झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  शेवटी शोभाताई धारीवाल परीवाराच्या वतीने आयोजित गौतम प्रसादीचा लाभ हजारो श्रावक श्राविका यांनी घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा