*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा प्रतिनिधी
विधवा महिलांना हळदी कुंकू लावून साडी वाटपाचा कार्यक्रम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद्मजाताई इंगवले जगताप यांनी श्रिपूर या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला.
पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा घेऊन शिवसेनेचे सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून शिवसेना नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराचा वारसा घेऊन श्रिपूर या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद्मजाताई इंगवले जगताप यांनी विधवा निराधार महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवून त्यांना साडी वाटप करून व त्यांच्या हस्ते लाडक्या भावांना राखी बांधून एक नवा उपक्रम राबवून देशाला समतेचा संदेश दिला
धार्मिक रूढी परंपरेला फाटा देऊन कनिष्ठ प्रथेला व रुडी परंपरेला झुगारून स्त्रीचं सौभाग्य ही तिच्या कपाळावरील कुंकवात असते आणि ते हिंदू धर्माचे प्रतीक असते या देशाची सरस्वती या देशाची लक्ष्मी या देशाची प्रगती या देशाची भाग्यशाली हे केवळ एक महिला आहे म्हणून तिचं आज राम वर असलेले सौभाग्य कोणीही विधवा आरोपी पुसण्याचे काम करू नये माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य मी विधवा माता-भगिनींना प्रथम प्राधान्य देते,माता जिजाऊ माता रमाई माता अहिल्या माता फातिमा, माता सावित्रीलेकी आहेत. श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर उजनी कॉलनी या ठिकाणी शिवसेना तालुकाप्रमुख नीताताई शिंदे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेनाओबीसी आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भीमराव भूषणर पाटील तसेच भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे तसेच माळशिरस विधानसभा संपर्कप्रमुख विजय कोकणे सोलापूर जिल्हा उपप्रमुख दीपक खंडागळे सोलापूर जिल्हा संघटक बापूसाहेब लोखंडे माळशिरस तालुका संघटक ग्रामपंचायत सदस्य हेमंतराव चव्हाण यांना राखीचा मान मिळाला.
शिवसेनेच्या रणरागिनी झुंजार कार्य असलेल्या पद्मजाताई यांनी विधवा निराधार एकलपाई महिलांना घरकुल असेल शिलाई मशीन असेल त्या ठिकाणी रस्ते गटारी प्रलंबित विकास असेल घरगुती व्यवसाय असेल बचत गट असेल अथवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार असेल अशा विविध प्रश्नावर स्वतः जातीने लक्ष घालून महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम सोलापूर सांगली या जिल्ह्यामध्ये केलेले आहेत त्यामुळे पद्मजाताई इंगवले यांचा महिलांनी मोठ्या संख्येने येऊन सत्कार गौरव केला या पुढच्या काळात महिलांचे कोणतेही प्रश्न असो तात्काळ सोडवले जातील फक्त चूल आणि मूल न पाहता प्रत्येक महिलांनी सक्षमीकरणावर भर द्यावी असे आवाहन केल्यानंतर व त्यांचे विचार पटल्यानंतर शेकडो महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपस्थित. पुष्पाताई वायदंडे, बेबीताई ,महिला रोपटके ममता शेख असंख्य कार्यकर्ते व शेकडो महिला उपस्थित होत्या



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा