*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज पोलीस ठाणेकडील ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई घरफोडी करणारे सराईत टोळीचा पर्दाफाश करत ०३ आरोपींना अटक करून आरोपींकडून एकूण १०,९२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन
अकलूज पोलीस ठाणे मध्येअपराध क्रमांक व कलम
१) गु.र.नं. ५४३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे अकलूज पोलीस झाला आहे
फिर्यादीचे नाव
. जितेंद्र जयंतराव इनामदार वय ५५ वर्षे रा. इनामदारवस्ती, नेवरे ता. माळशिरस जि. सोलापूर
गुन्हा घडल्याची तारीख व वेळ
दि. ०८/०८/२०२६ रोजी ०५:०० वा. ते दि. ०९/०८/२०२६ रोजी १०:०० वा. चे दरम्यान
गुन्हा दाखल तारीख वेळ
दिनांक ०९/०८/२०२६ रोजी २०/३५ वाजता.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली होती यामध्ये
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार आणि
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
श्रीमती प्रेरणा कट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग, सोलापूर ग्रामीण मा. श्री. संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज उपविभाग, अकलूज
निरज उबाळे, पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीसउप निरीक्षकविशाल कदम, पो.हे.कॉ. विनोद साठे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, तुषार (बबलू) गाडे, दत्तात्रय खरात, अनुराधा आडगळे, पो.कॉ. सोमनाथ माने, पंडीत गवळे, तुकाराम माने-देशमुख, विजय तवटे, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पो.कॉ. अजित सुरवसे व स्वप्निल जाधव यांनी केलेली आहे.
यामध्ये अटक केलेल्या आरोपीचे नाव पुढील प्रमाणे असून
१) सागर दिलखुश काळे वय ३६ वर्षे रा. जळोली ता. पंढरपूर जि. सोलापूर
२) आकाश उर्फ पपन्या संभाजी चव्हाण वय ३५ वर्षे रा. पडसतळ, सांगवी ता. पंढरपूर मुळ रा. बादलकोट ता. पंढरपूर
३) सुरज उर्फ दम्या रवि चव्हाण वय २४ वर्षे रा. पडसतळ, सांगवी ता. पंढरपूर मुळ रा. बादलकोट ता. पंढरपूर
जप्त मुद्देमाल
१) अकलूज पो. ठाणे गु.र.नं. ५४३/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याचा नेकलेस (१६.०५ ग्रॅम - २,२७,९१०/- रू.), सोन्याची चैन / लॉकेट (५.०५ ग्रॅम ७१७१७/- रू.), लहान मुलांच्या सोन्याच्या ७ अंगठ्या (१४ ग्रॅम - १,६३,८००/- रू.)
२) अकलूज पो. ठाणे गु.र.नं. ५७/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याची चैन (२० ग्रॅम २,८४,८००/- रू.), सोन्याची अंगठी (१० ग्रॅम - १,१७,०००/-रू.),
३) अकलूज पो. ठाणे गु.र.नं. ५०८/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याची अंगठी (५.०१ ग्रॅम ७१,०००/-रू.), सोन्याच्या २ लेडीज अंगठ्या (४ ग्रॅम - ४६,८००/-रू.),
४) अकलूज पो. ठाणे गु.र.नं. ५७७/२०२६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सोन्याचा लक्ष्मीहार (१६ ग्रॅम - ९०,०००/-रू.), सोन्याची अंगठी (३ ग्रॅम - २०,०००/-रू.)
असे एकूण १०,९२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
गुन्ह्याची थोडक्यात हकिकत अशीकी दिनांक ०८/०८/२०२६ रोजी ०५/०० वा. ते दिनांक ०९/०८/२०२६ रोजीचे सकाळी १०/०० वा. चे दरम्यान मौजे इनामदारवस्ती, नेवरे (ता. माळशिरस) येथील फिर्यादी जितेंद्र जयंतराव इनामदार यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरातील सोन्याचे दागिने १) ५०,०००/- रूपये किं. चे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, २) १५,०००/- रूपये किं. चे ६ ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे लॉकेट, ३) ३०,०००/- रूपये किं. चे ५ ग्रॅम वजनाचे ०२ सोन्याच्या अंगठ्या, ४) ५०,०००/- रूपये किं. चे १५ ग्रॅम वजनाच्या लहान मुलांच्या ७ सोन्याच्या अंगठ्या ५) १०,०००/-रूपये किं. चे ३ ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे एकूण १,५५,०००/- रूपये किंमतीचे दागिणे चोरून नेले होते. सदरबाबत अकलूज पोलीस ठाणेस गु.र.नं. ५४३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अकलूज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, सीडीआर अॅनालिसीस व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. संशयित आरोपी नामे सागर दिलखुश काळे वय ३६ वर्षे, रा. जळोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हा अनुषंगाने चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार आरोपी आकाश उर्फ पप्पण्या संभाजी चव्हाण वय ३५ वर्षे, व सुरज उर्फ दम्या रवी चव्हाण वय २४ वर्षे, दोघे सध्या रा. पडसतळ, सांगवी, ता. पंढरपूर, मूळ रा. बादलकोट ता. पंढरपूर यांचे मदतीने नेवरे, यशवंतनगर व स्वरूपनगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे व चोरी केलेले सोन्याचे दागिने करकंब ता. माळशिरस येथील सोनार "श्रीराम गोल्ड व सिल्व्हर पॅलेस" चे मालक शिवराज दीपक गोडसे रा. करकंब, ता. पंढरपूर याला विकल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदर सोनाराकडून एकूण ९,८२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश चव्हाण व सुरज चव्हाण हे त्यांचे राहते घरी असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे गेले असता आरोपीस पोलीसांची चाहूल लागताच पळून जात होते. त्यावेळी त्यांना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक ११/०९/२०२६ रोजी गुन्ह्यात अटक करून मा. हु।। न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक १५/०९/२०२६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करीत आहेत.
तसेच अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. ५७७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये अकलूज नवीन बस स्थानक येथे फिर्यादी हे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांचे बॅगेतून पर्स काढून घेऊन त्यामध्ये असलेले १) ९०,०००/- रू. किं. चे १६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, २) २०,०००/- रूपये किं. चे ०३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ३) ५,०००/- रूपये रोख रक्कम असा एकूण १,१५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अकलूज पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेऊन विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर संशयीत विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे गुन्हा अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल एकूण 1,10,000/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे विधीसंघर्षग्रस्त बालकाचे वडील यांनी हजर केल्याने सदरचा मुद्देमाल गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. १५७६ साठे हे करीत आहेत.
(निरज उबाळे)
पोलीस निरीक्षक
अकलूज पोलीस ठाणे
रविवार, १३ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
अकलूज पोलीस ठाणेकडील ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई घरफोडी करणारे सराईत टोळीचा पर्दाफाश करत ०३ आरोपींना अटक करून आरोपींकडून एकूण १०,९२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अकलूज पोलीस ठाणेकडील ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई घरफोडी करणारे सराईत टोळीचा पर्दाफाश करत ०३ आरोपींना अटक करून आरोपींकडून एकूण १०,९२,२२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा