Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी गोवा बनावटीची विषारी दारू व स्विफ्ट कार जप्त एकुण ०४,२३,५८०/-रू चा मुददेमाल केला जप्त

 *करमाळा तालुका --प्रतिनिधी*

  *आलिम शेख*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*


करमाळा पोलिसांनी देवळाली हद्दीत चार लाख 23 हजार 580 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबतची हकीगत अशी की दि ०१/०९/२०२६ रोजी रात्री २२/०० वा चे सुमारास मौजे देवळाली ता. करमाळा हददीतील अमोल सदाशिव शिंदे यांचे रहाते घराचे समोर व उसाचे शेतात, अवैधरित्या विनापरवाना बिगरपास परमिटने गोवा बनावटीची खालील वर्णनाची विषारी दारू त्यामध्ये


१)४,००,००० रू एक मारूती सुझुकी स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडी नं एम एच १२ केवाय 6616

२)२०,१६० रू royal impact grain whiskey नावाच्या दारूचे एकुण १२ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये प्लास्टिक बाटल्या, for sale in goa only असे छापील लेबल असलेले

३)१५६० रू किं चे officers choice blue प्लास्टिकचे बनावट २६० बुच

४)१७४० रू चे royal stag seagrams for Maharashtra असे लिहिलेले प्लास्टिकचे २९० बुच

५)१२० रू चे impact blue for maharashtra प्लास्टिकचे बनावट २०बुच





असा एकुण ४,२३,५८० चा /- रू किंमतीचा मुददेमाल बेकायदेशिर रित्या स्वतःचे कब्जात बाळगताना मिळुन आल्याने करमाळा पोलीस ठाणे गुरनं ७७४/२०२६ भा. न्याय संहिता कलम १२३,१३२,१८९(२),१९०,१९१(२), ३५१(२), ३५२, सह दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई),८०,८१,८३, १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ४,२३,५८० चा /-रू किंमतीचा दारूचा साठा मिळुन आल्याने त्याचा जागीच सहा. पोनि वळसणे सो यांनी पंचनामा केला. प्लास्टिकचे रिकामे बुच बाबत आरोपी याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरचे बुच हे मोठया बाटलीतील दारू काढुन त्यामध्ये हातभट्टी व इतर रसायन मिसळुन त्याला बनावट बुच लावुन १८० मिलीच्या इंग्लिश दारूच्या बनावट बाटल्या तयार करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. यावरून सदर इसम हे बनावट दारू बनविण्यासाठी गोवा बनावटी दारूचा उपयोग करत असल्याचे निष्पन्न झाले. अमोल शिंदे यास त्याचा भाउ आई व पत्नीचे नाव विचारले असता त्यांची नावे १) धनंजय सदाशिव शिंदे (भाउ) २) रतन सदाशिव शिंदे (आई)३) अनुसया अमोल शिंदे (पत्नी) असे असल्याचे सांगितले.

सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक बालाजी वळसणे हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय कबाडे, श्री. अंजना कृष्णा व्ही. एस. सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने, सहा. पोनि दिलिप ढेरे, सहा. पोनि बालाजी वळसणे, पो.उप.निरी./पुरुषोत्तम धापटे, पोहेकॉ/१८५४ दिपक घोरपडे, महोकॉ/१३१ शितल न्हावकर, पोना/९१२ वैभव ठेंगल, पोकॉ/१२५९ गणेश शिंदे, पोकॉ/१५२४ अमोल रंदील, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा