Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२६

कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे महाराष्ट्र तसेच सहकार चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९ माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील उर्फ भाऊ यांच्या २० व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवा नेते व संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवार ,मान्यवर, संस्थेचे सचिव व सर्व संचालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यानिमित्त समाधी स्थळावर नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले. श्री. नारायणदास रामदास प्रशालेमध्ये शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे 'चला संस्कार जपूयात' या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी शिवचरित्र तसेच वर्तमान काळातील अनेक विषयावरती भाष्य करीत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी सन १९५२ पासून आमदार, खासदार तसेच मंत्री पदाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच सहकार जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यांचा तोच वारसा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुढे चालवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे देशपातळी बरोबरच महाराष्ट्र तसेच इंदापूर तालुक्यामध्ये कृषी, सहकार तसेच शिक्षण, औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे कार्य आहे. त्यांनी सामान्य माणसांना न्याय दिला.नव्या पिढीला संस्कारक्षम बनविले.' कर्मयोगींच्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांनी यावेळी भाऊंना अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा