Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

दुःख वार्ता.. सोलापूरचे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक,कवी,लेखक, सेवानिवृत्त शिक्षक "बशीर परवाज" यांचे निधन

 *करमाळा- प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


सोलापूर - सोलापूरचे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक ' कवी , लेखक , निवृत शिक्षक बशीर अ कदीर दौलताबाद उर्फ "बशीर परवाज़ " यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले . त्यांच्या पाश्चत २ भाऊ , पत्नी, दोन मुले - मुली नातवडे असा परिवार आहे .

-शुक्रवारची नमाज नंतर जडेसाब कबस्तान येथे नमाजे जनाजा अदा करून तेथेच दफन करण्यात आले .



मरहूम बशीर परवाज़ हे बज्मे गालीबचे अध्यक्ष कुल हिंद उर्दू साहित्य परिषदचे उपाध्यक्ष व उर्दू मेलाचे संपादक म्हणून उर्दूच्या उन्नती साठी खूप काम केले होते त्याच्या निधनाने उर्दू साहित्याचे कधी ही भरून न येणारे मोठे नुकसान झाले आहे .व उर्दू भाषेत पोकळी निर्माण झाली आहे

निवृत शाखा अभियंता व उर्दू चे ज्येष्ठ कवी मीर अफज़ल यांचे ते मोठे भाऊ होते .

स्वर्गीय बशीर परवाज़ यांना २०१५ च्या सुमारस जिल्हा मराठी पत्रकार संघा तर्फे " उर्दू साहित्य सेवा पुरस्कार राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते देण्यात आले होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा