*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबां( रहे.) च्या उरूसानिमित्ताने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दर्गाहला शुक्रवारी (दि.4) भेट देऊन जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण केली व दर्शन घेतले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम बांधवांना व भाविकांना शुभेच्छा दिल्य
हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रभर प्रसिद्धीस आलेला आहे. या दर्गाहच्या विकासासाठी आपण आजपर्यंत सर्व प्रकारचे सहकार्य केले असून, आगामी काळातही आपले सहकार्य कायम राहील. जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत, असे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी दर्गाह ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बाबांच्या ऊरूसाचे हे 33 वे वर्ष आहे. दर्गाहला उरूसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लुमेवाडी येथे निरा नदीकाठी सर्वधर्मियांचे श्रध्दांस्थान असलेला सुफी संत फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा ( रहे.) यांचा दर्गाह आहे. या उरूसास पुणे, सोलापूर, मुंबई, सांगली, सातारा, धाराशिव, अहिल्यानगर, बीड आदी जिल्ह्यातील भक्तांबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी उपस्थिती लावत आहेत. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधला. यावेळी पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.
फोटो:-लुमेवाडी येथे उरूसानिमित्ताने फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण करताना हर्षवर्धन पाटील.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा