Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

धाराशिव जिल्ह्यात भीषण दुष्काळ जाहीर करून उपाययोजना लागू करा - अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाची मागणी*

*तुळजापूर प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* धाराशिव जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ५५% कमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे (म. राज्य सचिव) मा. तांबोळी मकबुल अल्लाउद्दीन यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सरासरी ५४९ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी फक्त २१० ते ३२० मिमी पाऊस झाला आहे. ८०% पेक्षा जास्त विहिरींनी तळ गाठला असून, बोरवेलचे पाणी ४०० फुटाखाली गेले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, शेतकरी व ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी २-३ किमी पायपीट करत आहेत. जनावरांसाठी चारा-पाणी नाही. *संघटनेच्या प्रमुख मागण्या:* 1) जिल्ह्यातील सर्व ३३२ महसूल मंडळाचे तात्काळ पैसेवारी व आणेवारी पंचनामे करून ५० पैसेवाली आणेवारी जाहीर करून संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. 2) जिल्ह्यात टँकर मुक्त नाही, तर टँकर युक्त धोरण लागू करावे - जिथे गरज तिथे तात्काळ टँकर मंजूर करावेत. 3) पिक विमा कंपनीला आदेश देऊन ५०% अग्रीम नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. 4) शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या कर्ज वसुली, वीज कनेक्शन तोडणी, शाळा फी वसुलीला स्थगिती द्यावी. 5) प्रत्येक तालुक्यात चारा छावण्या, पाण्याचे हौद व चारा डेपो तात्काळ सुरू करावेत. तसेच ८ दिवसात या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसह बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तांबोळी मकबुल अल्लाउद्दीन यांनी दिला आहे. या निवेदनावर जिल्हा कृषि अधीक्षक, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसीलदार, कृषि अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांनी आवक शिक्का मारून निवेदन स्वीकारले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा