*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
-----: लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील गाजीए मिल्लत सुफीसंत हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा (रहे.) यांचा ३३ वा उरूस संदल, कव्वाली आदि विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला. उरुसनिमित्त लुमेवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होत
हजरत सूफी वली चाँदपाशा, सूफी-ए-हिंद हजरत सय्यद अली रजा अमीर साहब किबला (अंबेजोगाई), हजरत यादअली साहब (छोटे बाबजी, राजस्थान), तसेच सज्जादा नशीन सूफी हसनैन कादरी (आवाटी शरीफ) यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली उरुसाचे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
यामध्ये उरुसच्या पहिल्या दिवशी गुरुवारी मजारवर संदल चढविण्याचा धार्मिक विधी पार पडला. शुक्रवारी मुख्य उरुसनिमित्त महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. तसेच लुमेवाडी व परिसरातील ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील विविध भागांतील भाविकांनी जोधपुरी बाबा यांच्या मजारचे दर्शन घेतले.
कव्वालीच्या जुगलबंदीने रंगली रात्र :-
शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सैफ आसिफ साबरी खान ब्रदर्स (मुंबई) आणि रफीक आफताब साबरी (उत्तर प्रदेश) यांच्यात कव्वालीचा जुगलबंदी मुकाबला रंगला. कव्वाली ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश :-
जोधपुरी बाबा यांच्या उरुसच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक बांधिलकी आणि सर्वधर्म समभावाची परंपरा जपली जात असल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. हिंदू-मुस्लिम समाजातील तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मजारवर पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
मानाचा संदल मिरवणुकीने दाखल :-
उरुसच्या परंपरेनुसार अकलूज (ता. माळशिरस) येथील काझी गल्ली येथून मानाचा संदल मिरवणुकीने लुमेवाडी येथे आणण्यात आला. या धार्मिक परंपरेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले
दालचा राईसचा महाप्रसाद:-
उरुसानिमित्त दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे भाविकांसाठी २२ क्विंटलचा दालचा राईसचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता. तर जियारतला एक क्विंटलचा गोडजर्दा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी आठ वाजता जियारत पार पडली आणि त्यानंतर उरुसाची सांगता करण्यात आली.
आकर्षक विद्युत रोषणाई:-
सादीकभाई उर्फ अदीशाह दर्गा डेकोरेशन अँड लायटिंग, विजापूर तसेच पांडे साउंड सिस्टीम, अकलूज यांच्या वतीने दर्गाह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व ध्वनिव्यवस्था करण्यात आली होती.
उरूस शांततेत पार पडण्यासाठी दर्गाह ट्रस्टी, सुफीसंत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा (रहे.) दर्गाह कमिटी, मुस्लिम जमात, ग्रामपंचायत लुमेवाडी, जोधपुरी बाबा यंग सर्कल यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, उरुसच्या काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांनीही शांतता व धार्मिक सलोखा राखत उरुसात सहभाग घेतला.
फोटो - लुमेवाडी येथे हाजी हाफिज फतेह मोहंमद जोधपूरी बाबांचा ३३ वा उरूस निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
------------------------------------------------------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा