*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
धाराशिव जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत तामलवाडी- काटगाव-मंगरुळ पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण झाले असल्यामुळे त्यांची पुनर चौकशी करा असे "आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तामलवाडी चे संस्थापक अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण तथा माजी सैनिक" यांनी एक लेखी तक्रार ईमेल निवेदनाद्वारे प्रशासनाकडे दाखल केली असून त्या कामामध्ये पुढील त्रुटी/दोष आहेत असे म्हटले आहे :-
१) मौजे तामलवाडी येथील गावांतर्गत रस्त्यामधून जलजीवन मिशन योजनेतील कामाचे पाईपलाईन नेल्यामुळे सर्व रस्त्यांचे नुकसान व तोडफोड झाले आहे व तसेच पूर्वीच्या ग्रामपंचायत तामलवाडीच्या केलेल्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन चे बहुतअंश ठिकाणी नुकसान झालेले असून त्याठिकाणी अशुद्ध पाणी येत आहे व काही ठिकाणी पाणी पुरवठा बंदच असल्यामुळे तात्काळ ते रस्ते व पाणी पुरवठा पाईपलाईन अंदाजपत्रकीय कामाप्रमाणे दुरुस्त करून द्यावेत व नागरिकांचे आरोग्याची दक्षता घ्या.
२) मौजे काटगाव ते तामलवाडी या रस्त्यावरील बहुतांश ठिकाणचे पाईपलाईन पी.डब्ल्यू.डी तुळजापूरच्या रस्त्यालगत अगदी १.५ ते २ फुटावर असून फक्त १ ते १.५ फूट खोलीवर करण्यात आलेल्या असून भविष्यात पी.डब्ल्यू.डी च्या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास किंवा सध्या सदरील हा रस्ता अरुंद असून त्यावरून परिसरातील शेतकऱ्यांची धान्याची उसाची अवजड वाहने गेल्यास सदरील पाईपलाईन दबने किंवा फुटणे यासारखे प्रकार होऊन त्यामधून कमी दाबाचा पाणीपुरवठा होऊन, पाईप मधून जीव जंतू जिवाणू, क्रमी इत्यादी पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यास त्यामध्ये शिरकाव होऊन नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो व अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे अमोनिया, नत्र, हायड्रोजन, सल्फाईड, कॅल्शियम, सोडियम, जस्त, मॅग्नीज, शेवाळे व कुजकी पाने, वाळू यामुळे जिवाणू, विषाणू, कृमी यामुळे साथीचे रोग होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विनाविलंब सदरील कामाच्या पुनर चौकशीचे आदेश देऊन दोषीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी होते होते काम दुसऱ्यांदा करण्यात यावे.
३) सदरील कामाची चौकशी तिसऱ्या पार्टी कडून करण्यात आली होती त्या चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला हजर राहण्याकरिता कळवण्यात आलेली नव्हती व
सदरील दोशी भ्रष्ट ठेकेदार कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करून गुन्हा नोंदवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या हि विनंती वजा तक्रारी निवेदन श्री सावंत यांनी महाराष्ट्राचे राज्याचे प्रधान सचिव, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जल जीवन मिशन महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग धाराशिव यांच्याकडे तक्रारी ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे त्यामुळे तामलवाडी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे
शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या तामलवाडी-काटगाव- मंगरुळ कामाचे तीन तेरा नऊ अठरा झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे पुनर चौकशी करा: माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांची मागणी*
*जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या तामलवाडी-काटगाव- मंगरुळ कामाचे तीन तेरा नऊ अठरा झाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे पुनर चौकशी करा: माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांची मागणी*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा