*माळीनगर- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळीनगर परिसरातील नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण व्हावी, नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची व कर्तव्यांची माहिती मिळावी, तसेच सामान्य नागरिकांना न्यायव्यवस्थेची प्रक्रिया समजावी, या उद्देशाने विधीसेवा फाऊंडेशनच्या वतीने कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, रमामाता कॉलनी, माळीनगर येथे उत्साहात पार पडली.
कार्यशाळेत विधीसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय बाबर यांनी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच फाऊंडेशनचे सचिव ॲड. सुमित सावंत यांनीही विविध कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत विधी सेवा फाऊंडेशनची माहिती, उद्दिष्टे व सदस्य नोंदणी, कायदेविषयक जनजागृती, एफआयआरपासून चार्जशीटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया, तक्रारदाराने काय करावे, तक्रारदारांचे अधिकार, तसेच नागरिकांचे संविधानिक अधिकार व हक्क या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना वक्त्यांनी नागरिकांनी कायद्याची भीती न बाळगता कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या हक्कांची माहिती असलेला जागरूक नागरिकच अन्यायाविरोधात योग्य पद्धतीने आवाज उठवू शकतो. कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यास योग्य वेळी कायदेशीर सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी ॲड निलेश जाधव, भाई ओव्हाळ, बाळासाहेब भोसले, अनिल लोंढे, सचिन दळवी, ग्रामपंचायत सदस्या चांदणी वजाळे , अलका तावरे, स्वाती शिंदे , सुवर्णा दळवी यांच्यासह माळीनगर परिसरातील महिला भगिनी, कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य अभिजित वजाळे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश कांबळे , यश शिंदे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधी सेवा फाउंडेशनचे सदस्य ॲड. अभिषेक चंदनशिवे यांनी केले, तर आभार सहसचिव ॲड. गोपाळ लावंड यांनी मानले.
रविवार, १३ सप्टेंबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*कायदेविषयक जनजागृतीसाठी,विधीसेवा फाउंडेशन च्या वतीने माळीनगर येथे कार्यशाळा संपन्न*
*कायदेविषयक जनजागृतीसाठी,विधीसेवा फाउंडेशन च्या वतीने माळीनगर येथे कार्यशाळा संपन्न*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा