*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो;-9730867448*
भारतीय संस्कृतीत गुरू आणि शिष्याचे नाते हे अत्यंत पवित्र, आदराचे आणि विश्वासाचे नाते मानले जाते. गुरू केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून, शिष्याला योग्य दिशा दाखवणारा, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा आणि जीवनातील चांगले-वाईट ओळखण्याची दृष्टी देणारा मार्गदर्शक असतो.
गुरूचे महत्त्व :
गुरू शिष्याला ज्ञान आणि संस्कार देतो.
अडचणीच्या काळात योग्य मार्गदर्शन करतो.
शिष्याच्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना विकसित करण्यास मदत करतो.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर जीवन जगण्याची कला शिकवतो.
शिष्याला आत्मविश्वास, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देतो.
शिष्याची भूमिका : शिष्याने गुरूच्या ज्ञानाचा आदर करावा, नम्रता ठेवावी आणि मिळालेल्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून स्वतःची प्रगती साधावी. खरा शिष्य गुरूचे अनुकरण करण्यापेक्षा गुरूने दाखवलेल्या योग्य मार्गावर स्वतःची वाट निर्माण करतो.
“गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ; आणि शिष्य म्हणजे त्या प्रकाशाचा योग्य मार्गाने उपयोग करणारा प्रवासी.” याला अनुसरून बिजवडी ता.माळशिरस जि. सोलापूर येथील शिक्षक संभाजी जाधव ज्यांनी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात ज्ञानार्जन करून अनेक विद्यार्थ्यांना घडवले त्यामधील एक त्यांचा विद्यार्थी सराटी ता. इंदापूर येथील मुबारक पापाभाई तांबोळी हे सैन्य दलात कार्यरत होते सैन्य दलातील सेवानिवृत्तीनंतर यांनी महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करून पोलीस दलातूनही ते निवृत्त झाले आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त त्यांना घडवणारे शिक्षक संभाजी जाधव यांचा ५० वर्षानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे शिक्षक संभाजी जाधव हेही विद्यार्थ्याच्या या प्रेमामुळे भारावून गेले
विशेष बाब म्हणजे माजी सैनिक मुबारक तांबोळी यांचे संपूर्ण शिक्षण अकलूज मध्येच झाले असून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात कार्य करत असताना पोलीस हवालदार म्हणून अकलूज पोलीस स्टेशनला ते निवृत्त झाले ही विशेष उल्लेखनीय बाब आहे तसेच पन्नास वर्षानंतर आपल्या ला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली हे मी माझे भाग्य समजतो असे याप्रसंगी माजी सैनिक मुबारक तांबोळी यांनी सांगितले
याप्रसंगी जब्बार तांबोळी नाना शिंदे अविनाश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा