Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६

सहायता वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने नागरी सुविधा विशेष अभियानाचे आयोजन

*अकलूज- प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
अकलूज नगर परिषदेचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील व नगराध्यक्षा रेश्मा ताई लालासाहेब आडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक 400 नगरसेवक मोहसीन भाई शेख व नगरसेविका सौ मंदाकिनी पाडोळे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषद नागरी सुविधा विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले असून अठरा वर्षावरील युवक व नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येत असून त्या अंतर्गत नवीन मतदार नोंदणी १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवती साठी नवीन मतदार नोंदणी, रेशन कार्ड ekyc, आयुष्यमान भारत कार्ड पात्र लाभार्थीसाठी ५ लाखापर्यंत आरोग्य उपचाराचा लाभ, या योजना उपलब्ध होणार असून हे विशेष अभियान रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असून अकलूज नगर परिषद जवळ किल्ला शाळा अकलूज येथे संपन्न होणार आहे तरी या शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सहायता वेल्फेअर फाउंडेशन अकलूज यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा