माळीनगर प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
मोहसिने मिल्लत अलहाल हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा रहमतुल्लाह अलै मुसलमान वाडी ता.इंदापूर जि.पुणे यांच्या ३३व्या भव्य ऊर्स निमित्त केवळ माळशिरस तालुक्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात यावर्षी निमित्त दिनांक 3 सप्टेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावातून संदल घेऊन भाविक भक्त लुमेवाडी ला जात असतात त्याचा अनुषंगाने माळीनगर येथील 'नवजवान दोस्ती ग्रुपच्या ब्रिगेडरने' हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी यांच्या ऊरुस निमित्त संदलची मिरवणूक अत्यंत देखणे आणि अविस्मरणीय असे आयोजन केले होती हे नयनरम्य दृश्य आणि सुंदर जी मिरवणूक पाहण्यासाठी व हाफीजसाहब बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वच समाजातील बांधव हजारोच्या संख्येने माळीनगर येथील बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित झाले होते.
या संदल सोहळ्याचे औचित्य साधून माळीनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू भाऊ राऊत'. यांनी संदल कलशा चे मनोभावे पूजन करुन दर्शन घेतले व बाबांच्या पवित्र उर्साला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
तसेच दोस्ती उद्योग समूहाचे सन्माननीय मालक व अध्यक्ष हाजी जब्बार शेठ तांबोळी' व सामाजिक कार्यकर्ते लायक भाई सय्यद' यांनीही पवित्र संदल कलशीचे दर्शन घेऊन पुढील सर्व कार्यक्रमांना व नवजवान दोस्ती ग्रुपला मोलाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर माळीनगर मधून सुंदर कलशाची सवाद्य मिरवणूक करण्यात आली होती त्यानंतर हा कलश मुसलमान वाडी येथील हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी यांच्या जागाकडे रवाना होऊन रात्री उशिरा हा संदलचा कार्यक्रम संपन्न झाला






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा