*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
माळशिरस तालुक्यातील वेळापूर, पिसेवाडी, श्रीपूर, बोरगाव, धानोरे, खंडाळी, विझोरी, मळोली, कोळगाव, पळवणी, तांदळवाडी, माळखांबी यांसह संपूर्ण तालुक्यात सायंकाळी व रात्रीच्या वेळेत सुरू असलेले अघोषित भारनियमन तात्काळ बंद करून २४ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आली.
वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, तर शेतकऱ्यांना शेती, पाणीपुरवठा, पशुपालन व दुग्ध व्यवसाय करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“भारनियमनाच्या नावाखाली विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी सुरू असलेला खेळ महावितरणने तात्काळ थांबवावा!”
— मिलिंद सरतापे, तालुकाध्यक्ष RPI आठवले, माळशिरस
अकलूज येथील महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता पी. एल. कोहळे यांना निवेदन देऊन दोन दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
मागणीची दखल न घेतल्यास दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
तसेच आवश्यकता भासल्यास महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा RPI आठवलेच्या वतीने देण्यात आला आहे.
“वीज हा नागरिकांच्या जीवनाचा मूलभूत भाग आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही!”
यावेळी उपस्थित :
नंदकुमार केंगार – राज्य संघटक
किरण धाईंजे – राज्य उपाध्यक्ष
मिलिंद सरतापे – तालुकाध्यक्ष
संतोष कांबळे – तालुका उपाध्यक्ष
,पोपट गेजग – तालुका संघटन सचिव
प्रविण साळवे – तालुका सरचिटणीस ,सतीश गायकवाड उपस्थित होते
वीज आमचा हक्क आहे!
भारनियमन बंद झालेच पाहिजे!
जनतेच्या प्रश्नासाठी RPI आठवले सदैव मैदानात!






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा