Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६

शालेय विद्यार्थ्यांना प्रा.गोरख कापरे यांच्याकडून माळीनगर प्रा.शाळा क्र.6 ,मध्ये स्कूल शूज चे वाटप .

उपसंपादक - नूरजहाँ शेख टाइम्स 45 न्युज मराठी
दि .सासवड माळी एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा क्रमांक 6 माळीनगर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चंद्रशेखर नारायण काका आगाशे या शाळेचे माझी प्राध्यापक श्री गोरख कापरे सर यांचे कडून स्कूल शूजचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाला परिसरातील महिला पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते तसेच शाळेत नवरात्रीनिमित्त भोंडला कार्यक्रम घेण्यात आला. सर्व पालक महिलांनी आनंदाने उत्साहाने सहभाग घेतला होता शाळेत अष्टमी असल्यामुळे कन्या पूजन घेण्यात आले मुलांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच स्कूल शूज देण्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह होता
कार्यक्रमासाठी शाळेच्या परिसरातील सारिका एकतपुरे सुशीला राऊत लता वाघ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी प्राध्यापक कापरे सर यांनी मुलांना शाळेचे महत्त्व दररोज शाळेत उपस्थित राहावे शाळेत वेळेवर यावे दररोज अभ्यास करावा आणि प्रत्येक उपक्रमात सहभाग घ्यावा हे मुलांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम अर्चना कुदळे यांनी केले आणि शेवटी आभार श्री संतोष कोळी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा