*उमरगा --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज व ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा तथा विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित सहावी 'विवेकयात्रा' मंगळवारी (दि. २०) उमरगा शहरात उत्साहात पार पडली. 'हातात पुस्तक, डोक्यात विवेक आणि हृदयात माणुसकी' हे ब्रीद घेऊन निघालेल्या या यात्रेत वाचन संस्कृती व विवेकवादी विचारांचा जागर करण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी सुमारे ५१ हजार रुपये रोख तसेच कपडे, शालेय साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत संकलित करण्यात आली.
उमरगा शहरातील हुतात्मा स्मारकापासून विवेकयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी मातोश्री शांताबाई चव्हाण, प्रभावती स्वामी, ऍड. शीतल चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षक विकास स्वामी, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. राजू बटगिरे व इतर मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशा, हलगी पथक व धनगर ढोल यांच्या गजरात विवेकयात्रा छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाली. विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांनी हातात पुस्तके, लेखण्या आणि महामानवांच्या विचारांचे फलक घेऊन यात्रेत सहभाग नोंदविला.
'पुस्तके आणि लेखण्या हीच आधुनिक काळातील आमची खरी शस्त्रास्त्रे आहेत. अज्ञानाच्या सीमा ओलांडून ज्ञानाच्या विश्वात प्रवेश करण्याचा, विचारांचे सोने लुटण्याचा आणि समाजात विवेकाचा जागर करण्याचा संदेश या यात्रेतून दिला जातो. मात्र, विवेक केवळ विचारांपुरता मर्यादित न राहता तो संकटात सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून आला पाहिजे. म्हणूनच यंदा दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या मदतीसाठी या विवेकयात्रेचे आयोजन करण्यात आले,' असे विवेकयात्रेचे संकल्पक ऍड. शीतल चव्हाण यांनी सांगितले.
उमरगा व लोहारा तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या 'बळीराजा आधार अभियान २०२६-२७' अंतर्गत मदत संकलन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संकलित रोख रक्कम व वस्तुरूप मदतीचे गरजू शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या मदत संकलन उपक्रमात प्रशांत झळके, मारुती कोळी, तुषार माहुलकर, ऍड. ज्ञानेश्वर मोरे, भीमाशंकर धुळे, रज्जाक अत्तार, मंगेश देशमुख, विक्रम चव्हाण, प्रशांत सोमवंशी, सुनील माने, प्रल्हाद सूर्यवंशी, श्रीकांत भराटे, सतीश पवार, प्रा. विनोद देवरकर, ऍड. ख्वाजा शेख, ऍड. बालाजी सोमवंशी, किशोर बसगुंडे आदींनी योगदान दिले.
विवेकयात्रेत शांताबाई चव्हाण, ऍड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, प्रा. राजू बटगिरे, किशोर बसगुंडे, विजय चितली, धम्मचारी प्रज्ञाजित, रज्जाक अत्तार, विकास स्वामी, प्रभावती स्वामी, रेखाताई पवार, ऍड. अर्चना जाधव, संतोष चव्हाण, माधव चव्हाण, संजय रुपाजी, हरीश डावरे, ज्योती माने, शबाना उडचणे, बबिता मदने, धीरज बेळंबकर, गिरीधर गोस्वामी, दिनेश गायकवाड, साक्षी चव्हाण, अण्णासाहेब पवार, युसूफ मुल्ला, अंबादास जाधव, नागेश चलकुरे यांच्यासह बहुजन हिताय वसतिगृहाचे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*विचारांच्या जागराला सामाजिक कृतीची जोड*
वाचन संस्कृती, वैज्ञानिक दृष्टिकोन, समता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या विवेकयात्रेने यंदा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसहभागातून निधी व साहित्य संकलित करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. 'विचारांचे सोने लुटताना माणुसकीची श्रीमंतीही वाढली पाहिजे,' हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
उमरग्यात विवेकयात्रेचा उत्साहात जागर; दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजारांची मदत संकलित! प्रा. शामराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या सहाव्या विवेकयात्रेत वाचन संस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
उमरग्यात विवेकयात्रेचा उत्साहात जागर; दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजारांची मदत संकलित! प्रा. शामराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या सहाव्या विवेकयात्रेत वाचन संस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा