Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६

कमलाई फेस्टिव्हलमध्ये देवराई ग्रुप करमाळाचा गौरव; सामाजिक कार्यासाठी प्रथम पारितोषिक

*करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा : कमलाई फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवराई ग्रुप, करमाळा यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. देवराई ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजहिताच्या उपक्रमांमध्ये(वृक्षारोपण )ग्रुपच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो. या कार्याची दखल घेत कमलाई फेस्टिव्हलमध्ये देवराई ग्रुपला सामाजिक कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देवराई ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार देवराई ग्रुपच्या सर्व सदस्यांसाठी आणि सामाजिक कार्यात सहकार्य करणाऱ्या नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या सन्मानाबद्दल देवराई ग्रुपचे करमाळा शहर व परिसरातून अभिनंदन होत असून, “समाजासाठी काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे आणखी वाढली असून भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील,” असा निर्धार देवराई ग्रुपचे संस्थापक एडवोकेट बाळासाहेब देशमुख व ग्रुपच्या इतर सदस्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा