Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२६

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानाची जनजागृती केल्याबद्दल माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले कौतुक

*मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448*
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानाची जनजागृती केल्याबद्दल माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे राज्यातील महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख मिळवून देण्यासाठी "महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026" कायदा अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2026 रोजी "महिला शेतकरी प्रमाणपत्र" पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे. "सेवा संकल्प अभियाना" अंतर्गत राज्यभरातून या उपक्रमास उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्हयामध्ये माळशिरस तालुक्याने दि. 17 ऑक्टोबर, 2026 पर्यंत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी 22054 अर्जाची नोंदणी करून जिल्हयात अधिक अर्जाचा टप्पा पार केला आहे. सदर कामगिरी महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या व्यापक अंमलबजावणीच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. आपल्या जिल्ह्यातील सहायक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, माविम व उमेद CRP, कृषि ताई, कृषि सखी, पशू सखी व इतर अधिकारी/कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे, घरोघरी केलेल्या जनजागृतीचे आणि महिला शेतकऱ्यांना दिलेल्या प्रत्यक्ष तांत्रिक सहाय्याचे हे फलित आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मी आपले व आपल्या संपूर्ण चमूचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपण व आपल्या तालुक्याच्या संपूर्ण क्षेत्रीय यंत्रणेने या उपक्रमात दाखविलेली तत्परता, समन्वय आणि जनाभिमुख कार्यशैली ही जिल्हयातील इतर तालुक्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. पुढील कालावधीतही हीच गती कायम ठेवावी. जिल्ह्यातील एकही पात्र महिला शेतकरी माहिती अभावी किंवा मार्गदर्शना अभावी या संधीपासून वंचित राहणार नाही यासाठी आपले प्रयत्न असेच सुरू राहतील, असा मला विश्वास आहे. असे म्हणून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा