इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
दि. २१ ऑक्टोबर २०२६
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मंगळवारी दि.२० ऑक्टोबर रोजी विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ॲड. करुणा राहुल मखरे व विद्यार्थिनींच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे ऊर्फ तात्या यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी प्रास्ताविक केले. मनिषा मखरे यांनी भगवान गौतम बुद्धांच्या करुणा, शांती व प्रज्ञेच्या विचारांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व विशद केले. प्रा. रेश्मा झेंडे यांनी विजयादशमीचे महत्त्व आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
महापुरुषांचे विचार आचरणात आणत सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला. महापुरुषांच्या विचारांची रुजवण आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असे संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या समता मखरे यांनी तर सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्या सविता गोफणे, अधीक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
भिमाई आश्रमशाळेत विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा! यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर; विद्यार्थ्यांनी दिला समता, बंधुता व शिक्षणाचा संदेश.
भिमाई आश्रमशाळेत विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा! यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर; विद्यार्थ्यांनी दिला समता, बंधुता व शिक्षणाचा संदेश.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा