पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
दि. २१ ऑक्टोबर २०२६
सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
खेळाडूंनी जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर आपले क्रीडाकौशल्य विकसित केल्यास यशस्वी करिअर करता येते. विजय मिळविण्यासाठी केवळ प्रतिभा पुरेशी नसून कठोर परिश्रम, आत्मविश्वास, संघभावना आणि पराभवातून शिकण्याची वृत्ती देखील तितकीच महत्त्वाची असते. खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधत क्रीडाक्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठावीत, असा प्रेरणादायी संदेश खडकी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी खेळाडूंना दिला.
खडकी एज्युकेशन सोसायटीच्या टी. जे. महाविद्यालय (स्वायत्त), खडकी येथे बास्केटबॉल कोचिंग कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे जिल्हा बास्केटबॉल पुरुष संघातील खेळाडू उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमधील बास्केटबॉलविषयक कौशल्ये विकसित करणे, खेळातील आधुनिक तंत्रांची माहिती देणे, प्रत्यक्ष सरावातून खेळाची गुणवत्ता उंचावणे आणि उदयोन्मुख खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे खेळाडूंना आपल्या क्षमतांची जाणीव होऊन भविष्यात जिल्हा, विद्यापीठ आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी श्री. गोयल यांनी व्यक्त केला.
यावेळी खडकी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सचिव आनंद छाजेड, सहसचिव सुरजभान अग्रवाल, संचालक अजय सूर्यवंशी रमेश अवस्थी, सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) उत्तम कुमार इंदोरे, श्री मुरकुटे, श्री. आल्हाट यांच्यासह संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयात क्रीडा संस्कृती रुजविणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यशाळेमुळे महाविद्यालयातील बास्केटबॉल खेळाडूंना तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याबरोबरच शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना वृद्धिंगत करण्याची संधी मिळणार असल्याचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले.
राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू बलदेवसिंग म्हणाले, स्पर्धेच्या युगात मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी दैनंदिन मैदानी खेळात पारंगत असणे गरजेचे आहे. यामुळे आपणास यशस्वी करिअर करण्यास मदत होते.
आभार महेश बेंडभर यांनी मानले.
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
जिद्द, शिस्त आणि संघभावनेतून क्रीडाक्षेत्रात यशाची उंच भरारी घेतल्यास यशस्वी करिअर करता येते : टी. जे. महाविद्यालयात बास्केटबॉल कोचिंग कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे प्रतिपादन
जिद्द, शिस्त आणि संघभावनेतून क्रीडाक्षेत्रात यशाची उंच भरारी घेतल्यास यशस्वी करिअर करता येते : टी. जे. महाविद्यालयात बास्केटबॉल कोचिंग कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे प्रतिपादन
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा