Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेच्या खेळाडूंचे घवघवीत यश* *वेटलिफ्टिंग, कुस्ती, ज्युदो व बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी; सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड*

*यशवंतनगर -प्रतिनिधी* *नाझिया मुल्ला* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगरच्या खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या गुणवत्तेची दमदार छाप उमटवत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. वेटलिफ्टिंग, कुस्ती, ज्युदो व बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांमध्ये प्रशालेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सात खेळाडूंनी विभागीय स्पर्धेची पात्रता मिळवली आहे. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सार्थक संग्राम राऊत याने १४ वर्षे वयोगटात जिल्हास्तरीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली, तर वैभव देशमुख याने १७ वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी केली. जिल्हास्तरीयज्युदो स्पर्धेत प्रशालेच्या मयुरी काळे हिने ४४ किलो वजनगटात १४ वर्षे वयोगटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. शुभम जाधव याने ७३ किलो वजनगटात १९ वर्षे वयोगटातून जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
कुस्तीच्या मैदानातही प्रशालेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मयुरी काळे, ओंकार नवसुपे, शुभम जाधव, अभिजीत करे, शंभुराजे कामकरे आणि सोहम शेंडे यांनी विविध वजनगटांत उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेचे नाव उज्ज्वल केले. तसेच वेटलिफ्टिंग स्पर्धेत मयुरी काळे, ओंकार नवसुपे ,शुभम जाधव ,शंभूराजे कारमकर, सोहम शेंडे ,वैष्णवी शिंदे, विजय कांबळेयांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची चमक दाखवली. खेळाडूंच्या या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण सराव, जिद्द, मेहनत आणि क्रीडा शिक्षक प्रदीप पांढरे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. मैदानावरील जिद्द आणि बुद्धिबळाच्या पटावरील एकाग्रता यांचा सुंदर संगम साधत प्रशालेच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील ,मुख्याध्यापक संजय गळीतकर, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा