Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

कालठण या.इंदापूर येथील ४१भाविकांना कै . लक्ष्मीबाईं. चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एस टी बस मधून देवदर्शन.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पुनर्वसित मौजे कालठण क्रमांक एक ( ता. इंदापूर ) येथील कै. लक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्ट च्या पुढाकाराने आयोजित तीन दिवशीय धार्मिक यात्रेचा ४१भावीकांनी लाभ घेतला. एस. टी बस मधून प्रवास करत ही धार्मिक यात्रा संपन्न झाली. यात्रा काळात भाविकांनी श्री अष्टविनायक, भिमाशंकर, एकवीरा देवी यांचा भक्तिभावाने जयघोष करत दर्शन घेतले. श्रीक्षेत्र ओझर व लेण्याद्री गणपती येथे उपस्थित भाविकांना आरतीचा मान मिळाला. लेण्याद्री गणपती येथे दर्शनात ८३ वर्षाच्या भावीक सुशीला शिंदे पाटील यांनी ४५ मिनिटांत २७२ पायरी चढून आरतीचा मान मिळवला. एकवीरा देवी दर्शनात देवी भक्तांनी सर्व माहिती घेतली. लेण्याद्री गणपती येथे भाविकांना वैशिष्ट्यपूर्ण रेखीव कलाकृती पहायला मिळाल्या. यात्रेत राणी क्षीरसागर, सिता जाधव, राणी कुंभार, मंगल शिंदे पाटील, शिवगंगा गोसावी, जयश्री करे, शैला नरुटे, आशा करे, वर्षा देवकाते, मयुरी बनसोडे, तृप्ती करे, ताई करे, सुशीला पावने, देवकी शेंडगे, सुषमा शेंडगे, स्वप्नांली शेंडगे, निकीता बनसोडे यांनी धार्मिक पर्यटनात सहभाग घेतला. धार्मिक सोहळा यशस्वीते साठी आगारप्रमुख हनुमंत गोसावी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक संजय वायदंडे, दत्तात्रय भोसले, अपर्णा पवार, वाहतूक नियंत्रक शंकर कोरटकर, विक्रम चंदनशिवे, भिमराव शिंगाडे, विशाल ननवरे यांनी सहकार्य केले. बस सेवेसाठी विवेक पोरे व नंदकुमार दळवी यांनी परीश्रम घेतले यात्रा काळात कळात अरूण कुंभार, पांडुरंग मदने आदींचे योगदान लाभले. भाविक तसेच इंदापूर बस आजाराने केलेल्या योग्य सहकार्यामुळे श्री अष्टविनायक, भिमाशंकर, एकवीरा देवी दर्शन सोहळा यशस्वी रित्या संपन्न झाल्याची माहिती आयोजक नितीन क्षीरसागर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा