Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

आविष्कार’मधून विद्यार्थ्यांच्या नवसंशोधन व नवकल्पनांना नवी दिशा — डॉ. देविदास वायदंडे. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात ‘आविष्कार २०२६’ संशोधन उपक्रम अंतर्गत सहा विभागांतील ३११ पोस्टर्सचे सादरीकरण

इंदापूर, डॉ. संदेश शहा*. *टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९*
विद्यार्थ्यांच्या नवसंशोधन व नवकल्पनांना नवी दिशा देण्यासाठी आविष्कार २०२६ हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे यांनी केले. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या सर्जनशीलतेला आणि नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ( स्वायत्त ), खडकी येथे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘आविष्कार २०२६’ या संशोधन उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहा विभागांतून एकूण ३११ पोस्टर्सचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. विनायक जोशी उपस्थित होते. यावेळी आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संस्थेचे सदस्य रमेश आवस्थी, सुधीर फेंगसे, ऍड. अजय सूर्यवंशी, शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, संस्थेचे सीईओ उत्तमकुमार इंदोरे हे मान्यवर उपस्थित होते. आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे पुढे म्हणाले, आविष्कार’सारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समस्यांकडे संशोधनात्मक पद्धतीने पाहण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. विविध विषयांतील संशोधनाला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण हेतू आहे. प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनाभिमुख वातावरण आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता नावीन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात, संशोधनाच्या माध्यमातून नव्या ज्ञानाची निर्मिती करावी आणि समाजोपयोगी संशोधनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आजच्या स्पर्धात्मक आणि ज्ञानाधिष्ठित युगात विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विचार, चिकित्सक दृष्टिकोन, निरीक्षणक्षमता आणि संशोधनकौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आविष्कार २०२६’मध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहा विभागांतून ३११ पोस्टर्स सादर करून आपल्या संशोधनकल्पना आणि नावीन्यपूर्ण विचारांचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना मांडण्याची, संशोधनकार्याला चालना देण्याची आणि इतर संशोधकांच्या संकल्पनांमधून नवीन दृष्टिकोन आत्मसात करण्याची संधी मिळाली असल्याचे डॉ. संजय चाकणे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. गौरी माटेकर यांनी, आयोजन डॉ. स्वप्नील सातपुते तर संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी आभार मानले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नवसंशोधन पोस्टर्सचे सादरीकरण यांमुळे ‘आविष्कार २०२६’ हा विद्यार्थ्यांच्या नवसंशोधनाला, कल्पकतेला आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा