उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मरा
राज्यातील दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळत असताना राज्याच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्यातील 180 शेतकऱ्यांना परदेशात जाऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत कृषी खात्याचे नऊ अधिकारीही दौऱ्यात सहभागी होणार आहेत. यासाठी चार कोटी रुपयांच्या निधीलाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात व कृषी बाजारपेठांची मागणी, कृषी माल प्रक्रिया यासोबत कृषी क्षेत्रात शेतकऱ्याचे ज्ञान उंचावण्यासाठी राज्यातील 'शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे' आयोजित करण्यात येतात. या वर्षात असे दौरे आयोजित करण्यासाठी कृषी विभागाने या दौऱ्याना आज प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्येक जिह्यातील पाच याप्रमाणे 34 जिह्यांतून एकूण 170 शेतकऱ्यांची निवड करण्यास मान्यता देण्यात आली तसेच प्रत्येक वीस शेतकऱ्यांच्या मागे एक अधिकारी याप्रमाणे नऊ अधिकाऱ्यांची निवड करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या दौऱ्यांची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
दौऱ्याच्या निधीत कपातीची शक्यता
राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत शेती तंत्राची ओळख करून देण्यासाठी असे दौरे आयोजित केले जातात. इस्रायलमधील शेती तसेच युरोपमधील बाजारपेठांची ओळख करून देण्यासाठी असे दौरे होतात. कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौरे करण्याची योजना 2004-2005 पासून राबवण्यात येत आहेत. अमेरिका व इराण युद्धाच्या काळात विदेशी चलनाची बचत करण्यासाठी सरकारने सर्व परदेश दौऱ्यांवर निर्बंध घातले होते. तेव्हा शेतकऱ्यांसाठी विदेश दौरा नियोजित होता पण त्या काळात हा दौरा पुढे ढकलण्यात आला पण हळूहळू सर्व निर्बंध शिथिल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता या दौऱ्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही फक्त मान्यता आहे. दौरा अंतिम झालेला नाही. चार कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली असली तरी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे वित्त खात्यातून या निधीत कपात केली जाण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*ऐन दुष्काळात वनव्यात शेतकरी होरपळत असताना कृषी अधिकारी चालले परदेश वारीवर! शेतकऱ्यांच्या आडून अभ्यास दौऱ्याची घाई!*
*ऐन दुष्काळात वनव्यात शेतकरी होरपळत असताना कृषी अधिकारी चालले परदेश वारीवर! शेतकऱ्यांच्या आडून अभ्यास दौऱ्याची घाई!*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा