Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२६

पतंजली योग समिती, इंदापूरच्या वतीने श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे कोजागिरी पोर्णिमे निमित्त ध्यानसाधना शिबिर व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो.९९२२४१९१५९



इंदापूर पतंजली योग समितीच्या  वतीने श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर परिसरात ध्यानसाधना शिबिर व स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात समितीच्या ४२ योगसाधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ध्यानातून मनःशांती, श्रमदानातून समाजसेवा! हे तत्व केंद्रबिंदू मानून हा उपक्रम संपन्न झाला.

पहाटेच्या पवित्र ब्रह्ममुहूर्तावर श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या गाभाऱ्यात योगसाधकांनी ध्यानधारणा केली. या वेळी साधकांनी आध्यात्मिक शांतता, एकाग्रता आणि प्रसन्नतेचा अनुभव घेतला. या ध्यानसाधना शिबिरासाठी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टने मंदिरात ध्यान करण्याची संधी उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले



ध्यानसाधनेनंतर सर्व योगसाधकांनी एकत्र येत मंदिर परिसर, घाट आणि घाटाच्या पायऱ्यांची स्वच्छता केली. श्रमदानाच्या माध्यमातून धार्मिक स्थळाची स्वच्छता व पावित्र्य जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. साधकांनी सेवाभावाने स्वच्छता अभियानात योगदान देत परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश योग व ध्यानाच्या माध्यमातून मनःशांतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे, तसेच धार्मिक स्थळांची स्वच्छता राखणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा होता.

या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टचे पतंजली योग समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

‘योगातून राष्ट्रसेवा’ या ध्येयाने प्रेरित होऊन योग, ध्यान, स्वच्छता आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

आदर्श पुरस्कार प्राप्त पतंजली योग समिती, इंदापूर च्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत प्राचार्य रवी काकडे, माजी मुख्याध्यापक धनंजय दुनाखे, पत्रकार गणेश काकडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा