*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील वीट येथे आज दुपारी अचानकपणे उसाच्या शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने एकच खळबळ व गावामध्ये कमालीचे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे
वीट तालुका करमाळा येथील बाळासाहेब उर्फ बाबू गोकुळ ढेरे सर यांच्या मोरवड वीट शिवे वरील उसाच्या फडामध्ये आज काही ऊस कामगार ऊस तोडणी करीत होते त्याच दरम्यान त्यांना बिबट्याची एकूण तीन पिल्ले आढळली यापैकी दोन पिल्ले पळून गेली असून एका पिल्लाला ऊसतोड कामगारांनी पकडून वनरक्षकाच्या ताब्यात दिले आहे वनरक्षकाने मात्र बिबट्याच्या पकडलेल्या पिल्लाला उसाच्या शेतात मोकळ्या कॅरेट मध्ये ठेवून आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे
कदाचित त्या पिल्लाला पाहून त्या पिल्लाची आई येण्याची दाट शक्यता असल्यामुळे सीसीटीव्ही वनरक्षकाने लावली आहे ऊसतोड कामगारांना अचानकपणे बिबट्याची पिल्ले आढळल्याने वीट गावात तसेच परिसरात एकच घबराटीचे वातावरण पसरले आहे सध्या बिबट्याला जन्म देणाऱ्या मादीला पकडण्यासाठी वनरक्षकाने सदर भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे पश्चिम भागातील वीट गावात अचानक पणे बिबट्याची पिल्ले आढळल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी वीट परिसरातील शेतकरी सध्या तरी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे काळजीपूर्व करीत असल्याचे पहावयास मिळत आहे
पिंजरा लावण्याची मागणी,,,,
वीट परिसरातील त्या बिबट्याच्या शोध घेण्यासाठी वनखात्याने आता पिंजरा लावणे आवश्यक आहे तेव्हा वन खात्याने त्वरित त्या पिल्लाच्या आईला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी बाबू ढेरे या ग्रामस्थांनी केली आहे
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वीट येथे बिबट्याची पिल्ले आढळल्याने शेतकरी वर्गात घबराहट
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वीट येथे बिबट्याची पिल्ले आढळल्याने शेतकरी वर्गात घबराहट
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा