*तामलवाडी प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*१९९३ सालच्या इमारती ३३ वर्षांनी अत्यंत धोकादायक; ग्रामपंचायतीकडे ०१ प्रस्ताव पूर्वीचा मंजूर ०२ प्रस्ताव मंजुरीसाठी ०३ महिन्यापूर्वी केले सादर बालकांच्या सुरक्षेसाठी तातडीने नवीन बांधकामाची गरज*
मौजे तामलवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील तीन अंगणवाडी केंद्रे क्र. ८२४, ८२६ व ८२७ या १९९३ साली बांधण्यात आलेल्या इमारती आता अत्यंत धोकादायक झाल्या असून यापूर्वीच ८२४ चे निर्लेखन करण्यास मान्यता देण्यात आली आहे ८२६ व ८२७ चे प्रस्ताव सादर असून मंजुरी बाकी आहे.
धोकादाय झालेली अंगणवाडीची 👆इमारत
*संदर्भ आणि पुरावे:*
१. ग्रामपंचायत कार्यालय तामलवाडी यांनी दि. ३१/०८/२०२३ रोजी अंगणवाडी क्र. ८२४ चा निर्लेखन प्रस्ताव परिपूर्ण सादर केला होता त्यास यापूर्वीच मंजुरी मिळाल्याचे समजते.
२. दि. १७/०४/२०२६ रोजीच्या पत्रानुसार परत अंगणवाडी क्र. ८२४ व ८२६, ८२७ सह इतर ०९ इमारती अत्यंत धोकादायक असल्याचा अहवाल पंचायत समिती बांधकाम विभागास सादर केला. (इमारत अंदाजित बांधकाम वर्ष १९९३, आयुमान ३३ वर्ष, शेरा - अत्यंत धोकादायक इमारत)
३. दि. ०९/०७/२०२६ रोजी पत्रांक ८८/२०२६ नुसार पुन्हा प्रस्ताव सादर.
४. अंगणवाडी क्रमांक ८२४ या प्रस्तावाला महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) तुळजापूर यांनी पूर्वीच धोक्याचा अहवाल सादर करून तातडीने नवीन बांधकामाची शिफारस केली आहे.
५. त्यानंतर जिल्हा परिषद धाराशिव यांचे पत्र क्र. जिपधा/बांवि/रेविशाखा/कावि/२६९२-२६९६/ २०२६ दि. २९/०९/२०२६ नुसार सदर तिन्ही ही अंगणवाड्यांचे निर्लेखन मंजूर करण्याकरिता प्रस्ताव पूर्वीच देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानानुसार प्रत्येक अंगणवाडी ही सुरक्षित व बालस्नेही असणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन नवीन इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी
श्री सावंत शिवाजी रामकृष्ण, माजी सैनिक व संस्थापक अध्यक्ष, आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तामलवाडी यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी जिल्हा प्रशासन, पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन इमारतीसाठी निधी व परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न केले.
श्री सावंत म्हणाले, "बालकांचे भविष्य सुरक्षित करणे हे आपले कर्तव्य आहे. आता नवीन इमारत झाल्याने बालकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण व पोषण मिळेल."
ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून नव्या इमारतीसाठी जागा निश्चिती सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार नवीन इमारत लवकरच उभारून बालकांना सुरक्षित सुविधा देण्याचे आश्वासन प्रशासनाने यापूर्वीच दिले आहे.
ठळक मुद्दे:
- निर्लेखन मंजूर अंगणवाडी क्रमांक ८२४ सह ८२६ व ८२७ अंगणवाड्यांचे निर्लेखनास मंजूरी मिळणार- 33 वर्ष जुनी इमारत धोकादायक ठरली- नवीन इमारतीसाठी प्रस्ताव मंजूर होऊन लवकर बांधकाम होणा- बालकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन तत्पर
फोटो ओळ:
- प्रस्तावित नवीन आदर्श अंगणवाडी केंद्राचे संकल्पचित्र - सुरक्षित, बालस्नेही व सुसज्ज
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*तामलवाडी मधील तीन धोकादायक अंगणवाड्या (८२४, ८२६, ८२७) नवीन इमारतीकरिता महिला व बाल विकास मंत्री श्री आदिती तटकरी व जिल्हा प्रशासनास माजी सैनिक सावंत यांचे साकडे*
*तामलवाडी मधील तीन धोकादायक अंगणवाड्या (८२४, ८२६, ८२७) नवीन इमारतीकरिता महिला व बाल विकास मंत्री श्री आदिती तटकरी व जिल्हा प्रशासनास माजी सैनिक सावंत यांचे साकडे*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा