*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
: तुळजापुर नगरपरिषदेची अग्निशमन वाहने नादुरूस्त असल्यामुळे आगीच्या दुर्घटनेत प्रभावी अग्निशमन सेवा देता न आल्याबाबत स्वतंत्र चौकशी करून मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी / कर्मचा-याची जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करावी अशी मागणी तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की
तुळजापुर शहरातील एका घरास आग लागल्याच्या गंभीर दुर्घटनेमध्ये घरातील व्यक्तीचा मृत्यु झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
सदर घटनेच्या वेळी तुळजापुर नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले; मात्र सदर वाहन नादुरूस्त असल्यामुळे आग विझविण्याचे प्रभावी काम करता आले नाही, अशी गंभीर वाव निदर्शनास आली आहे.
याशिवाय नगरपरिषदेचे दुसरे अग्निशमन वाहनही मागील सुमारे तीन महिन्यापासुन नादुरूस्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरातील अत्यावश्यक अग्निशमन सेवा प्रत्यक्षात कार्यक्षम स्थितीत होती का, यावावत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अग्निशमन सेवा ही नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणाशी थेट संबंधित अत्यावश्यक सेवा आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध अग्निशमन वाहने दीर्घकाळ नादुरूस्त राहणे आणि त्यांची वेळेवर दुरूस्ती अथवा पर्यायी व्यवस्था न करणे ही वाव गंभीर प्रशासकीय स्वरूपाची आहे.
त्यामुळे सदर प्रकरणाची नगरपरिषदेच्या अंतर्गत पातळीवर चौकशी न करता आपल्या स्तरावरून स्वतंत्र व निप्पक्ष चौकशी करण्यात यावी.
आमच्या पुढील माग्ण्या आहेत :
१. सदर आगीच्या दुर्घटनेबाबत स्वतंत्र प्रशासकीय चौकशी करण्यात यावी.
२. घटनास्थळी गेलेल्या अग्निशमन वाहनाची घटनेच्या दिवशीची तांत्रिक स्थिती तपासण्यात यावी.
३. दुसरे अग्निशमन वाहन तीन महिन्यापासुन नादुरूस्त का होते. याची चौकशी करण्यात यावी .
४. दोन्ही अग्निशमन वाहनाचे लॉगवुक, दुरूस्ती, रजिस्टर, सर्व्हिस रेकॉर्ड व तांत्रिक तपासणी अहवाल तपासण्यात यावेत.
५)अग्निशामक दलाच्या
दोन्ही वाहनांच्या दुरूस्ती व देखभालीवर आलेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी.
६. वाहन नादुरूस्तीवावतचे अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर दिल व देयकांची तपासणी करण्यात यावी.
७. वाहन नादुरूस्त असल्याची माहिती मुख्याधिकारी व संबंधित आधिका याना कधीपासुन होती, हे निश्चित करण्यात यावे.
८. वाहन नादुरूस्त असताना पर्यायी अग्निशमन व्यवस्था का उपल्बध करून देण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात यावी.
९. मुख्याधिकारी म्हणुन अग्निशमन सेवा कार्यक्षम ठेवण्यावावत सबंधितांची प्रशासकीय जबावदारी काय होती. याची निश्चिती करण्यात यावी.
१०. चौकशीत मुख्याधिकारी किंवा अन्य अधिकारी/कर्मचा-याची निप्काळजीपणा कर्तव्यता कसुर अथवा प्रशासकीय दुर्ल क्ष आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.
११. अग्निशमन वाहनाच्या नादुरूस्तीचा सदर दुर्घटनेतील आग नियंत्रणास झालेला विलंव व जीवित / मालमेत्तच्या नुकसानीशी काही संवध होता का, यावावत सक्षम तांत्रिक अधिका याकडुन अहवाल घेण्यात यावा.
१२. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तुळजापुर नगरपरिषदेची सर्व अग्निशमन वाहने तातडीने दुरूस्त करून पुर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्याचे आदेश देण्यात यावेत.
१३. सदर चौकशीचा अहवाल व करण्यात आलेली कार्यवाही याची माहिती आम्हाला नगरसेवक म्हणुन लेखी स्वरूपात देण्यात यावी.
सदर घटनेत जीवितहानी झालेली असल्याने प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी व आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असेही मागणी निवेदनाद्वारे केली आहे
आपले नम्र
अमोल माधवराव कुतवळ नगरसेवक न.प. तुळजापुर
आनंद नानासाहेब जगताप नगरसेवक न.प. तुळजापुर
रणजित चंद्रकांत इंगळे नगरसेवक न.प. तुळजापुर
अक्षय धनंजय कदम नगरसेवक न.प. तुळजापुर Aisne
प्रगती गोपाळ लोंढे नगरसेविका न. प. तुळजापुर
माहितीस्तव प्रत
मा. विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग.
आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र राज्य.
मा. मुख्याधिकारी, नगरपरिषद तुळजापुर.
मा. पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन तुळजापुर.
इत्यादींना पाठविण्यात आली आहे
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
तुळजापूर मध्ये आगीने तडफडून मृत्यू झाल्याची घटना --नगरपरिषदेचे अग्निशामक वाहन नादुरुस्त,याला जबाबदार कोण? याची चौकशी व्हावी जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करावी नगरसेवकांची मागणी
तुळजापूर मध्ये आगीने तडफडून मृत्यू झाल्याची घटना --नगरपरिषदेचे अग्निशामक वाहन नादुरुस्त,याला जबाबदार कोण? याची चौकशी व्हावी जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करावी नगरसेवकांची मागणी
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा