Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

*श्रीपूरमध्ये शहीद निवृत्ती जाधव यांचा १६ वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा.*

*अकलूज -प्रतिनिधी* *केदार लोहकरे* *टाइम्स 45 न्यूज मराठी0*
शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मृतिदिनी भव्य रॅली,अभ्यासिका केंद्राचे भूमिपूजन,शहीद जवानाच्या स्मारकावर अभिवादन,भव्य रॅली,वृक्षारोपण आणि अभ्यासिका केंद्राचे भूमिपूजन,स्मृती गौरव पुरस्कार संग्रामनगर दि.०५ (प्रतिनिधी) श्रीपूर (ता.माळशिरस) येथील शहीद पोलीस निरीक्षक निवृत्ती जाधव (सीआरपीएफ) यांचा सोळावा स्मृतिदिन विविध सामाजिक,शैक्षणिक आणि देशभक्तीपर उपक्रमांनी भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.वीरपत्नी सुरेखा जाधव यांनी उभारलेल्या शहीद निवृत्ती जाधव स्मारकस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहीद निवृत्ती जाधव हे ४ ऑक्टोबर २०१० रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याचे आणि देशसेवेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यंदाही श्रीपूरमध्ये त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
स्मृतिदिनानिमित्त सकाळी ग्रामस्थ,आरएसपी विद्यार्थी,कब-बुलबुल पथक तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले.यावेळी शहीद जवान ज्योत प्रज्वलीत करण्यात आली.त्यानंतर शहीद निवृत्ती जाधव यांच्या प्रतिमेची श्रीपूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.देशभक्तीपर घोषणांनी शहरातील वातावरण भारावून गेले.विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीमध्ये सहभाग घेतला. ४ ऑक्टोबर रोजी शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मारकस्थळी मान्यवरांच्या शुभहस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी शहीद जवानाला सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या देशसेवेचे आणि बलिदानाचे स्मरण केले.त्यांच्या त्यागातून युवकांनी देशसेवेची प्रेरणा घ्यावी असा संदेश यावेळी देण्यात आला.
जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैय्या बबनराव शिंदे यांच्या शुभहस्ते स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ३० लाख रुपयांच्या निधीतून शहीद निवृत्ती जाधव स्मारक परिसरात विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांमध्ये शहीद निवृत्ती जाधव अभ्यासिका केंद्राचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे,पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वनवे,वीरपत्नी सुरेखा निवृत्ती जाधव, मंडल अधिकारी शरद खंडागळे, प्राचार्य पांडुरंग बनसोडे,औदुंबर कदम या मान्यवरांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वनवे यांना तर महसूल विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाळुंगचे मंडल अधिकारी शरद खंडागळे यांना ‘शहीद निवृत्ती जाधव स्मृती गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.  यावेळी गटनेते राहुल रेडे,उपनगराध्यक्ष तानाजी भगत, नगरसेविका तेजश्री विक्रम लाटे, नगरसेवक प्रकाश नवगिरे आणि नगरसेवक सोमनाथ मुंडफने, ब्रीमा सागरचे नरेश पाठक,कॅप्टन लक्ष्मण माने,सुभेदार चांगदेव मोहिते,सीआरपीएफ पोलीस उपनिरीक्षक मुजाहिदूर रहमान, नवनाथ पवार,मौला पठाण, रावसाहेब सावंत पाटील,विक्रम लाटे,नामदेव पाटील,शिवाजी रेडे, अमर पिसाळ देशमुख,ग्राम महसूल अधिकारी निहाल जाधव, दादा लाटे,दादासाहेब गाडे आणि मारुती रेडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य पांडुरंग बनसोडे,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शंकर यादव, उपमुख्याध्यापक सुनील गवळी, सिताराम गुरव,शेंडे सर,हनुमंत मोरे आणि केचे सर यांनी सहकार्य केले.शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव,रवींद्र नाईकनवरे, भागवत पारसे,सुनील पताळे, सविता नाईकनवरे,सारिका नाईकनवरे,स्वाती पारसे,धर्मेश जाधव,प्रेरणा जाधव आणि अनुराग नाईकनवरे यांनीही योगदान दिले.श्री चंद्रशेखर विद्यालय,नारायण काकाचे कनिष्ठ महाविद्यालय,प्राथमिक शाळा तसेच शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान आणि बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता नाईकनवरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा