*सोलापूर --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सोलापूर : शहरात हातात धारदार कोयते घेऊन मोटारसायकलवरून फिरत दहशत माजविणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना एम.आय.डी.सी. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने जेरबंद केले. आरोपींकडून मोटारसायकल चोरीचे तब्बल ८ गुन्हे उघडकीस आणत ३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सैफन उर्फ सोहेल नुरोददीन बागवान (वय २७) आणि मोहन नागनाथ साळुंके (वय ४३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
१ ऑक्टोबर रोजी गांधीनगर, अक्कलकोट रोड परिसरात दोन इसम हातात धारदार कोयते घेऊन मोटारसायकलवरून आरडाओरड करत दहशत माजवत असल्याची माहिती एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. बिराजदार यांना माहिती देऊन पथकाने तातडीने कारवाई केली.
पोलिसांनी MH-13-FF-7053 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कोयते घेऊन फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. ही मोटारसायकल एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात चोरीस गेल्याचे तपासात स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता, मागील दोन महिन्यांत सोलापूर शहरातील विविध भागांतून आणखी ७ मोटारसायकली चोरल्याची कबुली त्यांनी दिली. या दुचाकी अक्कलकोट रोडवरील राजीव नगर परिसरातील पडीक इमारतीजवळ झाडीझुडपात लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्या सर्व ७ मोटारसायकली जप्त केल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, सैफन उर्फ सोहेल बागवान याच्यावर ८ गुन्हे, तर मोहन साळुंके याच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मोटारसायकल चोरी, शस्त्र कायदा तसेच महिला विषयक गुन्ह्यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. बिराजदार आणि पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकाने केली.
सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
सोलापुरात कोयते घेऊन दहशत माजविणारे दोन सराईत चोरटे जेरबंद! मोटारसायकल चोरीचे ८ गुन्हे उघड; ३ लाख १५ हजारांच्या ८ दुचाकी जप्त
सोलापुरात कोयते घेऊन दहशत माजविणारे दोन सराईत चोरटे जेरबंद! मोटारसायकल चोरीचे ८ गुन्हे उघड; ३ लाख १५ हजारांच्या ८ दुचाकी जप्त
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा