*निमगाव( मगराचे) ---प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार साखर कारखाना परिवारातील सर्व साखर कारखान्यातील युनिट एक चांदापुरी येथील साखर कारखान्यातुन प्रथम उत्पादीत झालेल्या साखर पोत्यांचे पुजन संचालक ओमराजे बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयवंत सुळ होते या बोलताना बोञे पाटील म्हणाले की चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार परिवाराने ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार कर्मचारीवर्ग पाठीशी खंबीर पणे उभा आहे
देशातील एकमेव ओंकार परिवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावलीत ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर देणारा एकमेव ओंकार साखर कारखाना परिवार आहे जनलमॅनेजर सर्व खाते प्रमुख कर्मचारीवर्गांचे त्यांनी अभिनंदन केले या वेळी जनलमॅनेजर भिमराव वाघमोङे ऊस उत्पादक शेतकरी नारायण करचे सर्जेराव पिंगळे नितीन जाधव केन मॅनेजर शरद देवकर चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते समाधान गायकवाड मोहन घोङके निलेश गुरव रमेश औताङे यासह बहुसंख्य कर्मचारीवर्ग उपस्थित होते आभार रामभाऊ मगर यांनी मानले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा