इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
गुरुवार ८ ऑक्टोबर २६ सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, तालुका क्रीडा संकुल व रयत शिक्षण संस्थेचे सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो १४ वर्षाखालील मुली स्पर्धेत
सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम तर लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा सोमवार दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेत १२० संघानी भाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांच्या हस्ते तसेच विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी महेश चावले म्हणाले, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी खेळात पारंगत असणे गरजेचे आहे. आता खेळातून देखील आपले करिअर करून आत्मनिर्भर होता येते. यावेळी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी विद्यार्थी सुनील जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सर्व विजयी संघ व उपविजेत्या संघाना आणि उत्कृष्ट प्रशिक्षक यांना सन्मान चिन्ह उमेश राऊत यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये १४,१७, व १९ वर्षाखालील मुले मुलींच्या १२० संघांनी सहभाग नोंदवला. यावेळी बावडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ घोगरे, लाकडी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूराव ढोले, राधिका विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद झोळ, पोलीस उपनिरीक्षक श्री. तोडरमल साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात विजयी झालेले संघ खालील प्रमाणे.
*१४ वर्षाखालील मुली*
प्रथम - सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर.
द्वितीय - प्रगती विद्यालय लोणी देवकर.
*१४ वर्षाखालील मुले*
प्रथम- श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी
द्वितीय - श्री नीलकंठेश्वर विद्यालय, लासूर्णे.
*१७ वर्षाखालील मुली*
प्रथम - शिवाजी विद्यालय, वरकुटे बुद्रुक.
द्वितीय - उदमाई विद्यालय घोलपवाडी.
*१७ वर्षाखालील मुले*
प्रथम- श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी
द्वितीय -श्री नीलकंठेश्वर विद्यालय, लासूर्णे.
*१९ वर्षाखालील मुली*
प्रथम- सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, इंदापूर.
द्वितीय - न्यू इंग्लिश स्कूल लाकडी.
*१९ वर्षाखालील मुले*
प्रथम- श्री नंदिकेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज जंक्शन.
द्वितीय - आय. कॉलेज इंदापूर.
विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले. स्पर्धा आयोजक सुनील मोहिते व रणजीत सातपुते यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम तर लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयाने पटकावला द्वितीय क्रमांक.
तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम तर लोणी देवकर येथील प्रगती विद्यालयाने पटकावला द्वितीय क्रमांक.
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा