Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२६

*विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राचे क्रीडा स्पर्धांमध्ये यश.*

*अकलूज --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
* यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धा सि.टी. बोरा महाविद्यालय शिरुर (जि. पुणे) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या.या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. या विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. व्ही.बी.गायकवाड यांचे शुभहस्ते तर शिरुर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेमध्ये अकलूज अभ्यासकेंद्रातील १५ खेळाडूंनी धावणे,उंच उडी,लांब उडी,तिहेरी उडी,बॅडमिंटन,कुस्ती,भाला फेक, थाळीफेक,बास्केटबॉल,कबड्डी, खो-खो व बुद्धिबळ या खेळात सहभाग घेतला.सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.यामध्ये वेदांत लावंड तिहेरी उडी (प्रथम क्रमांक),श्रद्धा जगताप १५०० मीटर धावणे (प्रथम क्रमांक),रेहान तांबोळी उंच उडी (प्रथम क्रमांक),महेश जाधव भाला फेक (प्रथम क्रमांक),पियुष घुले कुस्ती (प्रथम क्रमांक),यश गोसावी फ्रीस्टाइल कुस्ती (प्रथम क्रमांक) या सर्व खेळाडूंनी यश मिळविल्याने त्यांची नाशिक येथील केंद्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच शोएब तांबोळी बास्केटबॉल, लक्ष्मण थिटे खो-खो,विराट गायकवाड,धीरज वाघमारे व प्रणव गुजर यांची कबड्डी संघात निवड झाली.संघ व्यवस्थापक म्हणून तानाजी बावळे वेळापूरकर यांनी काम पहिले. या यशस्वी खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक जयसिंह मोहिते- पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरुपाराणी मोहिते- पाटील,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सयाजीराजे मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे- पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर,केंद्र संयोजक डॉ.बाळासाहेब मुळीक व सर्व समंत्रक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा