इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
इंदापूर ( जि. पुणे ) येथील सुप्रसिद्ध आरोग्यम् योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राच्या संस्थापक संचालिका डॉ. सुवर्णा विजय नवल पाटील यांना निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन आणि योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या वतीने भातृमंडळ हॉल, बुलढाणा येथे निसर्गोपचार क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ, योगाचार्य, थेरपिस्ट तसेच आयुष क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड, बुलढाणा नगरपालिका नगराध्यक्षा सौ. पूजाताई गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले तसेच एमजीएम विद्यापीठाच्या योग विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद खरात उपस्थित होते.
मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, सौ. दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, सौ. स्मिता खारकर, राहुल देशमुख, आशिष सूर्यवंशी तसेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ प्रदान करून गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात डॉ. सुवर्णा विजय नवल पाटील यांना निसर्गोपचार थेरपीच्या प्रचार-प्रसारासाठी तसेच सामाजिक आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
डॉ. सुवर्णा पाटील या मागील अनेक वर्षांपासून योग व निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्य सातत्याने करीत आहेत. त्याचबरोबर वृद्ध, गोरगरीब तसेच ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य व निसर्गोपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, अशा एका शिबिरामध्ये १०० हून अधिक रुग्णांची मोफत सेवा करण्यात आली होती.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान, संतवीर गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्त युवक संघ व युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी सेवाकार्य करण्यात आले. यामध्ये अनेक वारकऱ्यांना मोफत चरणसेवा, मसाज तसेच मोफत तेलमालिश करून आरोग्यसेवा देण्यात आली. योग, निसर्गोपचार आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून, विशेषतः वंचित, गरजू, वृद्ध, कष्टकरी, ऊसतोड कामगार आणि वारकरी बांधवांसाठी सेवाभावाने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेण्यात आली. समाजामध्ये आरोग्यसेवेची जाणीव निर्माण करणाऱ्या आणि सेवाभावाने कार्य करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. सुवर्णा पाटील यांच्या या कार्यामुळे निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृतीसोबतच सामाजिक आरोग्यसेवेचा आदर्श निर्माण होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर आणि निसर्गोपचार या सात चिकित्सा पद्धतींशी संबंधित क्षेत्रांना एकत्रित घेऊन कार्य करणारी संस्था आहे.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन योगाचार्य विजय नवल पाटील व सौ. स्मिता खारकर यांनी केले.
डॉ. सुवर्णा विजय नवल पाटील यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल इंदापूर शहर, परिसर तसेच मित्रपरिवार, हितचिंतक आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
इंदापूरच्या डॉ. सुवर्णा पाटील यांचा बुलढाण्यात ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ने गौरव
इंदापूरच्या डॉ. सुवर्णा पाटील यांचा बुलढाण्यात ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ने गौरव
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा