*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उजनीवरील होऊ पाहणारे ए आय डाटा सेंटर सहीतचे चार प्रकल्फ शेतकऱ्यांच्या विकासाला हानीकारक असतील तर करमाळा तालुक्यातील सर्वच राजकीय गटांनी एकत्र येऊन विरोध करावा,असे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी जेऊर ता करमाळा येथील एका कार्यक्रमातुन केले.
उजनी वरील चार प्रकल्प व वीज, पाणी वाटप तसेच मच्छीमारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जेऊर ता करमाळा येथे 'उजनी परिषद' आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायण आबा पाटील हे होते तर यावेळी व्यासपीठावर नितीनराजे राजेभोसले, जि प सदस्य भाऊसाहेब गोडसे, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, पंचायत समिती सदस्य व गटनेते अतुलभाऊ पाटील, पं स सदस्य ज्ञानेश्वर बिचीतकर, स्वप्नील काळे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक दत्तात्रय देशमुख, दत्तात्रय गव्हाणे, श्रीमंत चौधरी, विजयसिंह नवले, कृषीभूषण दादासाहेब पाटील, आबासो आंबारे, महादेव पौरे, रामेश्वर तळेकर, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, रविभाऊ कोकरे, अविनाश सरडे, बाबासाहेब बोरकर, श्रीहरी कदम, चंद्रप्रकाश दराडे, अमर ठोंबरे, विकास गलांडे, सुहास गलांडे, नाना पवार यांचेसह स्वप्नील आरकीले, ताटे सर (इंदापूर) आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की एक तर उजनी धरणास पन्नास वर्षे झाली पण तरीही करमाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आजही हक्काचे पाणी व अखंडीत वीजपुरवठा दिला जात नाही. धरण उशाला असुनही धशाला कोरड निर्माण होते. अजुन पुनर्वसित गावांना अठरा नागरि सुविधा मिळाल्या नाहीत. धरणग्रस्तांच्या मुलांना त्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या नाहीत. यामुळे अगोदर आमचे जे हक्काचे आहे ते द्यावे असे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर शेतकरी या प्रकल्पास विरोध करत असल्याने आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर यावेळी स्वप्नील आरकीले, ताटे सर, नितीनराजे राजेभोसले, दत्ताकाका सरडे अविनाश सरडे, महेंद्र पाटील आदिसह अनेकांनी आपली मते अभ्यासपूर्वक रित्या मांडली. या बैठकीस उजनी पट्ट्यातील आजी माजी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
*उजनीवरील प्रकल्पा विरोधात तालुक्यातील सर्वच गटांनी एकत्र यावे, आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन*
*उजनीवरील प्रकल्पा विरोधात तालुक्यातील सर्वच गटांनी एकत्र यावे, आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा