Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

*दुःखाच्या छायेतही ३७ वर्षांची अन्नदान परंपरा अखंड*! *केतनच्या स्मृतींना उजाळा देत अग्रवाल परिवाराकडून पायी येणाऱ्या भाविकांची सेवा; ‘जस्टिस फॉर केतन’चा भावनिक संदेश*

 *तुळजापूर--- प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:- 9730867448*



सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा अग्रवाल परिवाराचा अन्नदान उपक्रम यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अखंड सुरू राहिला. सोलापूरहून श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांसाठी अग्रवाल परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात आले. विशेष म्हणजे, जवळपास ३७ वर्षांपासून सुरू असलेली ही अन्नदानाची परंपरा परिवारातील दुःखद प्रसंगानंतरही खंडित न होता पुढे सुरू ठेवण्यात आली. दिवंगत केतन अग्रवाल यांच्या स्मृतींची वेदना मनात असतानाही सेवाकार्याची परंपरा जपण्यात आली.

अग्रवाल परिवारातील ज्येष्ठ लाला किसन बनवारीलाल अग्रवाल यांनी या अन्नदान उपक्रमाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे चिरंजीव दिवंगत देवीचंद किसनलाल अग्रवाल यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. आता विशाल अग्रवाल हे त्याच सेवाभावाने हा उपक्रम पुढे नेत आहेत. तीन पिढ्यांपासून सुरू असलेली ही अन्नदानाची परंपरा भाविकांच्या सेवेसाठी समर्पित असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.



कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूरहून पायी प्रवास करून तुळजापूरला येणाऱ्या भाविकांसाठी सांगवी मार्डी येथे  पुरी-भाजी, शिरा, उच्च दर्जाचा भात आणि बंद पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. लांबचा पायी प्रवास करून येणाऱ्या भाविकांना थकवा जाणवत असताना त्यांना भोजन आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा परिवाराचा हा उपक्रम सेवाभावाचे उदाहरण ठरला.

या सेवाकार्यात विशाल देवीचंद अग्रवाल, सौ. राखी विशाल अग्रवाल, विजय देवीचंद अग्रवाल, संजना अग्रवाल, कुलदीप अग्रवाल, पुष्पाताई देवीचंद अग्रवाल, दीपक अग्रवाल आणि अनिल पवनकुमार अग्रवाल यांच्यासह परिवारातील सदस्य सहभागी झाले.

केतन अग्रवाल यांच्या हत्येमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण परिस्थितीतही आजोबांनी सुरू केलेला अन्नदानाचा सेवायज्ञ खंडित होऊ नये, यासाठी परिवाराने पुढाकार घेतला. दिवंगत देवीचंद अग्रवाल यांनी जपलेली परंपरा आता विशाल अग्रवाल पुढे नेत आहेत. वैयक्तिक दुःखाच्या काळातही भाविकांची सेवा करण्याची ही भूमिका उपस्थितांच्या मनाला स्पर्श करणारी ठरली.

यावेळी विशाल अग्रवाल यांनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना व्यक्त करत, केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळावा आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी भावना व्यक्त केली. ‘जस्टिस फॉर केतन’ हा संदेशही यानिमित्ताने पुढे आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा