Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६

हर्षवर्धन पाटील यांच्या भीमा नदीमध्ये तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित निर्णय घेण्याचा दिला आदेश.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९ दि. २२ ऑक्टोबर २०२६
भीमा नदी कोरडी पडल्याने इंदापूर तालुका तसेच शेजारील तालुक्यामधील नळ पाणीपुरवठा योजना तसेच जनावरांचा पिण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे उजनीतून भीमा नदीमध्ये तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दूरध्वनीवरून गुरुवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी केली. यावेळी त्यांनी येथील गंभीर परिस्थिती विशद केली. या गंभीर प्रश्नावर तातडीने सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन देत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी सोडणे संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन व उजनी धरण अधिक्षक अभियंता सु. स. खांडेकर यांना उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडणे संदर्भात त्वरित निर्णय घेण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिले. अनेक दिवसांपासून भीमा नदी पात्र कोरडे पडल्याने इंदापूर, माढा, माळशिरस तालुका तसेच मंगळवेढा, पंढरपूर शहर आदी सुमारे ४० नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. परिणामी लाखो नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना चारा तसेच पाण्यासाठी तातडीने उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्र्याकडे केली. या मागणीवरती राधाकृष्ण विखे पाटील यांनी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये तातडीने पाणी सोडणेसंदर्भात सकारात्मक आहे असा दिलासा दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा