*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उजनीवर होऊ पाहणाऱ्या चार प्रकल्पाच्या बाबतीत काल आमदार नारायण आबा पाटील यांनी लागलीच एक बैठक घेऊर धरणग्रस्त शेतकऱ्यांची मते जाणून घेतली आणि जाहिरपणे या प्रकल्पास विरोध केला. मात्र आज बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी याच उजनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्तांच्या भावना जाणुन घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस एक माजी लोकप्रतिनिधी या नात्याने माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना त्यांनी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. यावरुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचा निर्णय घेतला नाही हे दिसुन येते व या विषयी संजयमामांची भुमिका ही तळ्यात मळ्यात असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे. यावर अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या भुमिकेचे पाटील गटाकडूनही आम्ही स्वागतच करतो. परंतू माजी आमदार संजयमामा शिंदे यांचाही या चार प्रकल्पास विरोध असल्याचे सुभाष आबा सांगत आहेत त्यावर आमचा तरी मुळीच विश्वास नाही व शेतकऱ्यांचाही यावर विश्वास नसणार आहे. आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील उजनीकाठच्या शेतकऱ्यांच्या वरील या संकटास सामोरे जाऊन विरोध करण्यासाठी सर्वच राजकीय गटांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे असे आवाहन केले आहे. यानंतरही माजी आमदार संजयमामा शिंदे व जि प सदस्या रश्मीदिदी बागल यांच्या भुमिका स्पष्ट होत नसतील तर यांना उजनीकाठच्या शेतकऱ्यांच्या व्यथाशी काही घेणंदेणं नाही असच म्हणावं लागेल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ज्याप्रमाणे बागल व शिंदे एकत्र येऊन लढले होते. अगदी त्याच प्रमाणे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर म्हणजेच उजनीच्या प्रकल्पास सुध्दा बागल-शिंदे यांनी एकत्रितपणेच विरोध करायला हवा होता ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु माजी आमदार संजयमामा शिंदे अथवा रश्मीदिदी बागल यांची या प्रकल्पास विरोध असल्याची चार ओळीची प्रेस नोट सुध्दा येऊ नये ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे हे कदाचित शेतकऱ्यांच्या दबावापोटी ३१ तारखेस आंदोलनात सहभागी होतील परंतु मनापासून विरोध करणार नाहीत असा दावा प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे. बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांच्या भुमिकेचे मात्र आम्ही पाटील गट व तमाम धरणग्रस्त हे स्वागतच करत असल्याचे तळेकर यांनी सांगितले.
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६
Home
/
Unlabelled
/
गुळवेंनी बोलवलेल्या उजनी बैठकीला माजी आमदार संजयमामांची गैरहजेरी म्हणजेच प्रकल्पांना मुकसंमती, तळेकर यांचा गंभीर आरोप*
गुळवेंनी बोलवलेल्या उजनी बैठकीला माजी आमदार संजयमामांची गैरहजेरी म्हणजेच प्रकल्पांना मुकसंमती, तळेकर यांचा गंभीर आरोप*
Tags
About संपादक हुसेन मुलानी
Chief Editor of AJ_24_Taas
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा