Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२६

भारतीय हँडबॉल संघाने बांगलादेश ला हरवले .

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


बांगलादेश येथे झालेल्या बेगम खलिदा जिया आयएचएफ नेशन ट्रॉफी एशिया झोन टू च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेश ला 28/ 16 असा पराभव करून दणदणीत विजय संपादन केला आहे .

या यशाबद्दल भारतीय हँडबॉल संघाच्या प्रशिक्षिका उषाताई ढमाळ पुणे यांच्या योग्य नियोजनाने भारतीय संघाने विजय संपादन केला आहे हँडबॉल संघाच्या प्रशिक्षका उषाताई ढमाळ यांनी आपल्या संघाच्या कौतुकावर बोलताना स्पष्ट केले की संघातील खेळाडूंना आत्मविश्वास जागवणे ,संघ भावना दूर करणे, सातत्याने डावपेच प्रोत्साहन देणे, विजयासाठी असलेली जिद्द व शिस्त निर्माण करणे हे एका प्रशिक्षकाचे खरे सामर्थ्य असते .

 या विजयी झालेल्या खेळाडूंवर महाराष्ट्र राज्य हँडबॉल तसेच जिल्हास्तरावरील हँडबॉल खेळाडूंनी अभिनंदन केलेले आहे .व पुढील यशाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे .

तसेच पुढे ढमाळ यांनी म्हटले आहे की नवीन युवकांमध्ये हँडबॉल खेळासाठी नवीन पिढी घडावे यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तालुकास्तरावर ती हँडबॉल चे सामने  शासनाने कॉलेज ,शाळेने घेण्यात यावेत तरच पुढची पिढी निर्माण केली जाईल. त्यात हँडबॉल खेळाची आवड निर्माण होईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा