Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२६

*करमाळा तालुक्यातील कंदरच्या कुस्ती संकुलातील दोघांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड..*

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


कंदर तालुका करमाळा येथील छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुलातील सराव करीत असलेल्या यशराज जाधव व यश सुरवसे या दोन मल्लांनी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक  पटकावत उल्लेखनीय कामगिरी करित यश संपादन केले आहे.*पैलवान यशराज जयराम  जाधव*

*14 वर्ष वयोगटात 62 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला तसेच *पैलवान यश राजेंद्र सुरवसे* 

*14 वर्ष वयोगटात 41 किलो वजन गटात राज्यात प्रथम क्रमांक* मिळवून पुढे  दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. याबद्दल दोन यशस्वी मल्लांचा सत्कार कंदर येथील छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुल येथे करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि क्रीडा अधिकारी काकडे अहिल्यानगर यांच्या वतीने नेवासा फाटा जिल्हा अहमदनगर येथे 21 व 22 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्रतील आठ विभागातील प्रत्येकी एका वजन गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता .या स्पर्धेत  यशराज जाधव व यश सुरवसे याने प्रतिस्पर्ध्यावर मात करीत सुवर्णा गवसणी घातली‌आणि‌ राष्ट्रीय स्पर्धेच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.


यावेळी कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उमेश काका इंगळे‌ तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे माजी उपसरपंच रावसाहेब जाधव माजी उपसरपंच अकलाख जहागिरदार कविटगाव चे सरपंच शिवाजी सरडे रयत क्रांती चे जिल्हा संपर्क राजकुमार सरडे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष संपत सरडे रघुनाथ कामटे पोपट पवार दीपक खोचरे नानासाहेब फरतडे उत्तम लांडगे पत्रकार संदीप कांबळे अमित जगदाळे नानासाहेब गरड युवा निर्माण अकॅडमीचे गणेश लोकरे डॉक्टर रमेश इंगळे कुस्ती प्रशिक्षक धर्मेंद्र यादव नाईकवाडी अमोल डांगे‌ लखन शिंदे सुहास मुळे बालाजी इंगळे अर्जुन इंगळे भोजलिंग माने बाबासाहेब शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संपत सरडे गणेश लोकरे नानासाहेब फडतडे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विठ्ठल काळे यांनी केले तर आभार कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उमेश काका‌ इंगळे यांनी मानले...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा